क्रीडा

कोल्हापूर राज्य कॅरम स्पर्धेत आकांक्षा – सागर विजेते 

कोल्हापूर : 

शंभूराजे फ्रेंड्स सर्कल, कोल्हापूर आयोजित आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या सागर वाघमारेने मुंबईच्या विकास धारियाला २४-१४, २५-१५ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून या गटाचे विजेतेपद पटकाविले. तर महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणवर २५-७, २५-१५ अशा सरळ दोन सेटमध्ये मात करून या गटाचे विजेतेपद पटकाविले.

महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरने ठाण्याच्या मधुरा देवळेला २५-११, २५-१९ असे हरविले. तर पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या अभिजीत त्रिपानकरने ठाण्याच्या पंकज पवारला २५-१२, २५-१६ असे नमविले. विजेत्या पहिल्या आठ खेळाडूंना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव योगेश फणसळकर, कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम असोसिएशनचे सचिव विजय जाधव, छत्रपती शंभूराजे मंडळाचे मान्यवर पदाधिकारी व प्रमुख पंच सूर्यकांत पाटील उपस्थित होते.

पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल

  • विकास धारिया (मुंबई) वि वि अभिजीत त्रिपानकर (पुणे) २-२५, १८-९, २३-१९
  • सागर वाघमारे ( पुणे ) वि वि पंकज पवार ( ठाणे ) १६-१९, २५-१३, २५-११

महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल

  • आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) वि वि प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) २१-१९, १२-२५, १९-१७
  • केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) वि वि मधुरा देवळे ( ठाणे ) १८-५, २१-२०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *