
कर्ज घेण्याशिवाय (Home Loan) बहुतेक लोकांना एखादी कार किंवा एखादे घर खरेदी करायचे असेल तर दुसरा पर्याय नसतो. कारण कर्ज घेतल्याने वस्तू खरेदीचा आर्थिक भार तुमच्या सेव्हिंगवर पडत नाही. पण यात तुम्हाला घर किंवा कारच्या रकमेवर व्याज मात्र द्यावे लागते.
होम लोनचा कालावधी (Home Loan) दीर्घ काळाचा असतो. यातच प्रत्येक कर्जदाराला असे वाटत असते की ईएमआय कमी (Home Loan EMI) व्हावा आणि कर्ज देखील लवकर मिटावे. जर कर्जदाराकडे एखाद्या वेळी एकरकमी पैसे आले तर यातून होम लोन काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. किंवा या पैशांची एसआयपीमध्ये गुंतवणुक (SIP Investment) करून मोठा निधी उभा करता येऊ शकतो. पण बहुतेकांना यातील कोणता पर्याय फायद्याचा राहील याची माहिती नसते. आज आपण याच गोष्टीची माहिती घेऊ या..
आधी होम लोनमध्ये पैसे भरल्यास काय होईल
लोनचा कालावधी पूर्ण होण्याआधीच जर तुम्ही होम जर कर्ज क्लिअर करत असाल तर अशा वेळी तुम्हाला प्री क्लोजर चार्जेस (Pre Closure Charges) द्यावे लागतील. यातून अप्रत्यक्षपणे तुम्हालाच आर्थिक भुर्दंड बसेल. परंतु लोन पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पैसे उधारी मिटविण्यासाठी खर्च करत होतात तोच पैसा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी गुंतवून मोठा फंड तयार करू शकता.
तुम्ही कर्जाच्या मुद्दल रकमेतील काही रक्कम अशाच पद्धतीने भरून ईएमआय कमी करू शकता. परंतु यासाठीही काही बँकांकडून चार्जेस घेतले जातात. याबाबतीत वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे नियम आहेत.
प्रथम SIP मध्ये गुंतवणूक केल्यास काय होईल
जर हेच पैसे तुम्ही कर्जात भरण्याऐवजी म्युच्युअल फंड एसआयपी (Mutual Fund SIP) मध्ये गुंतवणूक केले तर तुम्हाला मोठा निधी निश्चित उभारता येईल. तुम्ही तुमच्यावरील कर्ज नंतर याच पैशांतून अगदी सहज क्लिअर करू शकता. ज्यावेळी तुमच्याकडे कमी अमाऊंट असेल त्यावेळी तुम्ही या पैशांच्या माध्यमातून होम लोन मिटवू शकता. म्युच्युअल फंडात साधारण 12 टक्के दराने परतावा दिला जातो. यामध्ये कंपाऊंडिंगचा फायदा सुद्धा मिळतो. यामुळे नफा दुप्पट होतो. शेअर बाजाराच्या चढ उतारावर म्युच्युअल फंडात मिळणारा परतावा अवलंबून असतो.