मुख्य बातम्याशहर

Pahelgam:पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह आज मुंबईत आणणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतः सर्व यंत्रणासोबत समन्वय

मुंबई :

पहलगाम (Pahelgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पर्यटकांच्या पार्थिवांनासह त्यांच्या नातेवाईकांना परत आणण्याची प्रक्रिया राज्य सरकारने तातडीने सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या संपूर्ण प्रक्रियेचा बारकाईने आढावा घेत असून आवश्यक ते मार्गदर्शन करत आहेत.

या कार्यासाठी श्रीनगरमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच दाखल झाली आहे. ते पार्थिव आणि नातेवाईकांना विमानात बसवण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

मंत्री गुलाबराव पाटील योगेश कदम मुंबई विमानतळावर उपस्थित राहणार

मुंबईत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेची टीम समन्वयासाठी श्रीनगरमध्ये दाखल

दरम्यान, श्रीनगरमध्ये अडकलेल्या इतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. शिवसेनेची एक टीम अद्याप श्रीनगरमध्येच ठाण मांडून मदतीसाठी कार्यरत आहे.

रुग्णालयामध्ये सुरू होणार क्रीडा दुखापतींसाठी स्वतंत्र विभाग

हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव एअर इंडिया विमानाद्वारे श्रीनगरहून मुंबईला आणले जाणार असून हे विमान आज दुपारी 12.05 वाजता मुंबईकडे रवाना होईल.

पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव संध्याकाळी 6 वाजता निघणाऱ्या विमानाने पुण्यात आणले जाणार आहे.

डोंबिवलीचे रहिवासी हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेणारे विमान दुपारी 1.15 वाजता श्रीनगरहून निघून मुंबईत दाखल होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *