
नवी मुंबई :
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई (AHNM) ने आपल्या प्रगत हृदयरोग (Heart Disease) देखभाल क्षमता पुन्हा एकदा दर्शवत, अलीकडेच एका २४ वर्षीय महिलेचे आणि ५५ वर्षीय पुरूषाचे प्राण वाचवले. यशस्वी उपचार करण्यात आलेल्या दोन केसेसपैकी एक पल्मनरी एम्बोलिजम आणि दुसरी मायोकार्डियल इन्फार्क्शनची होती.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. ब्रजेश कुंवर यांनी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मल्टी-डिसिप्लिनरी टीमच्या मदतीने दोन्ही केसेसमध्ये उपचारांचे नेतृत्व केले. फुफ्फुसांच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे पल्मोनरी एम्बोलिजम होतो. यामध्ये जीवाला धोका असू शकतो. मृत्युदर ६०% पर्यंत आहे.
मायोकार्डियल इन्फार्क्शन (एमआय), ज्याला सामान्य भाषेत हृदयविकाराचा झटका म्हणून ओळखले जाते, ते हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा अचानक बंद पडल्यामुळे होते. भारतात, एमआय हे मृत्युचे एक प्रमुख कारण आहे आणि भारतात एमआय बहुतेकदा पाश्चात्य देशांपेक्षा वयाच्या एक दशक आधी सुरू होते.
दोन्ही केसेसमध्ये रुग्ण जीवघेण्या स्थितीत होते – अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये दाखल केले तेव्हा श्रीमती पूजा आणि श्री संजीव सेठ यांची प्रकृती खूपच गंभीर होती. पण, डॉ. कुंवर आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नांमुळे, दोघांच्या तब्येतीमध्ये उल्लेखनीय सुधारणा झाली. या केसेसमध्ये मिळालेल्या यशाने टीमच्या क्षमता सिद्ध केल्या.
डॉ.ब्रजेश कुंवर,वरिष्ठ सल्लागार, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले,“पहिल्या केसमध्ये, २४ वर्षीय श्रीमती पूजा यांना पहाटे २ वाजता दाखल करण्यात आले, तेव्हा त्यांना गंभीर पल्मनरी एम्बोलिजमचे निदान करण्यात आलेले होते. या स्थितीत फुफ्फुसांच्या धमनीमध्ये गुठळ्यांमुळे अडथळा निर्माण होतो, त्यामुळे रुग्णाला त्वरित उपचारांची आवश्यकता असते.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे दाखल होताच सर्व आपत्कालीन कार्डियाक प्रोटोकॉलची खात्री करून रुग्णाला ताबडतोब प्रगत कॅथ लॅबमध्ये नेण्यात आले. त्वरित उपचारांमुळे श्रीमती पूजा यांची प्रकृती खूप सुधारली. त्यांना ३ दिवसांत घरी सोडण्यात आले. अशा प्रकारे, एका तरुणीचा जीव वाचला. आज श्रीमती पूजा त्यांच्या गावी आपल्या प्रियजनांसोबत सुट्टीचा आनंद घेत आहेत.
दुसऱ्या केसमध्ये, ५५ वर्षीय श्री संजीव सेठ यांना मोठ्या प्रमाणात मायोकार्डियल इन्फार्क्शन झाल्याने अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये दाखल करण्यात आले. कुटुंब खूप ठाम होते आणि आम्ही इम्पेला प्लेसमेंट करण्याचा निर्णय घेतला. इम्पेला हे कृत्रिम हृदय आहे. या प्रक्रियेनंतर, श्री संजीव यांची तब्येत बरी होऊ लागली. त्यांनी उत्तम प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आणि आम्ही त्यांचे व्हेंटिलेटर बाजूला केले.
सहाय्यक देखभालीमुळे त्यांची तब्येत बरी झाली आणि त्यांना घरी सोडण्यात आले. या दोन्ही केसेस गुंतागुंतीच्या होत्या आणि अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील डॉक्टरांच्या मल्टी-डिसिप्लिनरी टीमच्या मदतीने त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले.
रायगड येथील रहिवासी श्रीमती पूजा स्वतःचा अनुभव सांगत होत्या, “मला छातीत तीव्र वेदना होत होत्या आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. मी उपचारांसाठी रुग्णालयात गेले, तिथे त्यांनी मला पल्मोनरी एम्बोलिजम असल्याचे निदान केले आणि मला अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे रेफर केले.
शासकीय रुग्णालयांमध्ये मानवी अवयव पुनर्प्राप्ती केंद्रांची निर्मिती होणार..
डॉ. ब्रजेश यांनी अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये माझ्यावर उपचार केले आणि मला लगेचच माझ्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे जाणवले. माझा जीव धोक्यात होता, पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी बरी झाले. माझा जीव वाचवल्याबद्दल डॉ. ब्रजेश आणि त्यांच्या टीमची मी खूप आभारी आहे.”