आरोग्य

Varicose Veins:तिशीतच सतावतेय व्हेरिकोज व्हेन्सची समस्या

पायांमध्ये वेदना, स्नायुंमधील जडपणा, सूज आणि फुगलेल्या शिरा अशी लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करु नका

मुंबई:

तिशीतल्या तरुणांमध्येही हल्ली (Varicose Veins) व्हेरिकोज व्हेन्सची समस्या डोकं वर काढत आहे. यामध्ये रुग्णांना पाय दुखणे, जडपणा येणे आणि पायाच्या शिरा फुगलेल्या दिसून येतात. बैठी जीवनशैली, तासनतास एकाच स्थिती बसुन करावे लागणारे काम, सतत उभे रहावे लागणे, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, गर्भधारणा आणि जागरूकतेचा अभाव ही व्हेरिकोज व्हेन्सची प्रमुख कारणे ठरत आहेत.

जर वेळीच उपचार केले नाहीत तर ते अल्सर किंवा शिरी फुटण्सासारख्या गंभीर गुंतागुंत निर्माण करु शकतात. व्हेरिकोज व्हेन्सचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. डॉ. अशांक बन्सल, एक प्रसिद्ध एंडोव्हस्कुलर सर्जन असून त्यांची टीम एंडोव्हेनस लेसर थेरपी (EVLT) सारख्या आधुनिक आणि मिनीमली इन्व्हेसिव्ह तंत्रांचा वापर करून प्रभावी उपचार करते. या उपचारांमुळे रुग्णांना जलद पुनर्प्राप्ती, कमीत कमी वेदना आणि दीर्घकालीन आराम मिळतो.

युनायटेड किंग्डममधील ५२ वर्षीय शिक्षिका रूथ स्कॉलिंग यांना पाच ते सहा महिन्यांपासून व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सतावत होता. त्यांची प्रकृती इतकी गंभीर झाली होती की त्यांना चालणे किंवा उभे राहणे देखील शक्य होत नव्हते. ती गेल्या ३ वर्षांपासून यूकेमध्ये NHS (नॅशनल हेल्थ सिस्टीम) अंतर्गत उपचार घेण्यासाठी वाट पाहत होती, परंतु शस्त्रक्रियेची तारीख निघून गेल्याने ती निराश झाली. त्यानंतर ती उपचार घेण्यासाठी भारतात आली.

कलर डॉपलर चाचणीने दुहेरी व्हेरिकोज व्हेन्सचे (दोन्ही पायांमध्ये व्हेरिकोज व्हेन्स) निदान झाले. EVLT (एंडोव्हस्कुलर लेसर ट्रीटमेंट) ही एक दुर्बींणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये लेसर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ही प्रक्रिया खराब झालेल्या शिरा बंद केल्या जातात आणि निरोगी शिरांमधून रक्तप्रवाह सुरळीत होतो. ही शस्त्रक्रिया भूल देऊन केली जाते आणि रुग्ण कमीत कमी कालावधीत सामान्य क्रियामध्ये करु शकतो.

वेळीच उपचार आणि तज्ञांच्या मदतीने जीवनाची गुणवत्ता सुधारता येते. या प्रक्रियेनंतर २४ तासांच्या आत, तिला घरी सोडण्यात आले आणि एका आठवड्यात ती वेदनामुक्त आयुष्य जगु लागली. रूथसारखे इतर अनेक रुग्ण आहेत जे व्हेरिकोज व्हेन्सशी झुंजत आहेत आणि त्याचा त्रास सहन करत आहेत. जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

डॉ. अशांक बन्सल सांगतात की, व्हेरिकोज वेन्स म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये रक्त एकाच ठिकाणी जमा होते. यामुळे आपल्या शिरा फुगतात आणि पायात प्रचंड वेदना निर्माण होते. दीर्घकाळ उभे राहिल्याने किंवा चालण्यामुळे पायांवर ताण येतो. दीर्घकाळ उभे राहणे, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, हार्मोनल बदल, गर्भधारणा आणि वय हे व्हेरिकोज वेन्सला कारणीभूत घटक आहेत. व्हेरिकोज वेन्सच्या लक्षणांमध्ये सहसा वेदना होणे, स्नायुंमधील जडपणा, सूज आणि फुगलेल्या शिरा अशी लक्षणे दिसून येतात.

जर वेळीच उपचार न केले तर त्यामुळे पायात अल्सर, संसर्ग, त्वचेचा रंग बदलणे किंवा अगदी शिरा फुटण्यासारखी गुंतागुंत होऊ शकतात. आमच्या क्लिनिकमध्ये, आम्ही दर आठवड्याला अशा सुमारे ३०-४० रुग्णांवर उपचार करतो, तिशीतील तरुणांमध्ये ही समस्या वाढत असून यामध्ये वेदना, खाज सुटणे, सूज येणे आणि पायातील जडपणा अशा लक्षणे आढळतात.

ही स्थिती टाळण्यासाठी, नियमित पायांची हालचाल करा, जास्त वेळ उभे राहणे टाळा, वजन नियंत्रित राखा आणि कॉम्प्रेशन स्टॉकिंग्जचा वापर करा. सध्या, EVLT सारखे प्रभावी उपचार पर्याय उपलब्ध आहेत. व्हेरिकोज वेन्सची समस्या घेऊन रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पूर्वी १० ते १२ इतकी होती. मात्र आता त्यात तिपटीने वाढ झाली असून ही संख्या जवळजवळ ३०-४० रुग्णांमध्ये आढळते. बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव हे यामागचे मुख्य कारण ठरत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून, व्हेरिकोज व्हेन्समुळे माझ्या पायांमध्ये सतत वेदना आणि जडपणा जाणवत होता. उभे राहणे किंवा कमीत कमी अंतर चालत गाठणे देखील अशक्य होऊ लागले. ते केवळ शारीरिकदृष्ट्या थकवणारे नव्हते तर भावनिकदृष्ट्या मला कमकुवत करत होते. मी घरी अनेक उपचार पर्यायांचा वापरून पाहिले, परंतु कायमस्वरूपी आराम मिळाला नाही. नंतर उपचारासाठी मी भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि याठिकाणी मला आशेचा नवीन किरण मिळाला. डॉ. अशांक बन्सल आणि त्यांच्या टीम माझ्यावर यशस्वी उपचार केले. त्यांच्यामुळे मी आता वेदनारहित आयुष्य जगु शकते अशी प्रतिक्रिया रुग्ण रूथ स्कॉलिंग यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध करावी

वरील कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. वेळीच निदान आणि उपचार हे लोकांना अधिक सक्रिय, वेदनामुक्त जीवन जगण्यास मदत करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *