
नवी मुंबई :
नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, सिल्वर ज्युबिली हॉल ( एसी ) सेक्टर १ – अ, एमजीएम हॉस्पिटल जवळ, वाशी, नवी मुंबई – ४००७०३ येथे ५९ व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा : School:राज्यभरातील ३१ हजार ११ शाळा ‘जिओ टॅगिंग’पासून दूर
१० ते १३ मे २०२५ दरम्यान हि स्पर्धा रंगणार असून पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष वयस्कर एकेरी (५० वर्षांवरील), महिला वयस्कर एकेरी ( ५० वर्षावरील ), पुरुष सांघिक गट व महिला सांघिक गट अशा एकंदर सहा विभागात हि स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation या संकेत स्थळावर उपलब्ध असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघटनेशी संपर्क साधावा. स्पर्धेचे प्रवेश अर्ज दिनांक २८ एप्रिल २०२५ पर्यंत सायंकाळी ६. ३० ते ८.३० दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजा राणी चौक जवळ, शिवाजी पार्क, दादर ( पश्चिम ) येथे स्वीकारण्यात येतील.
हेही वाचा : Hospital:सन्मानासह अखेरच्या प्रवासासाठी जे.जे. रुग्णालयात EV शववाहिनी
स्पर्धेच्या कालावधीत राज्य पंच परीक्षा घेण्यात येणार असून इच्छुक उमेदवाराने आपली नावे पंच परीक्षा अर्ज व शुल्क भरून जिल्हा संघटनेच्या शिफारशीने २८ एप्रिल २०२५ पर्यंत राज्य संघटनेकडे पाठवावीत. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.