मुख्य बातम्याशहर

ST:नवीन बसेस एसटीसाठी ‘संजीवनी’ ठरतील – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास

नवीन बसेस प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यामुळे एसटीपासून दुरावलेला प्रवासी वर्ग देखील पुन्हा एसटीकडे भविष्यात वळू शकतो.

मुंबई :

कित्येक वर्ष आर्थिक गर्दीत सापडलेल्या एसटी (ST) महामंडळाला ऊर्जेत अवस्था आणण्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या नवीन बसेस या ‘संजीवनी’चे काम करतील, असा विश्वास परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. मंत्री सरनाईक यांनी आज मंत्रालयातील नवीन दालनात प्रवेश केला त्या वेळी शुभेच्छा स्वीकारताना झालेल्या अनौपचारिक गप्पांच्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.

सरनाईक यांना महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने एसटीच्या ‘लालपरी’ मॉडेलची प्रतिकृती भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्यासह परिवहन आयुक्त विवेक भीमनराव, परिवहन सहसचिव किरण होळकर, एसटी महामंडळाचे आर्थिक सल्लागार व मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख इत्यादी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गेली कित्येक वर्ष आर्थिक अडचणीमुळे एसटीच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे जुन्या बसेस नव्या करून त्याद्वारे प्रवासी वाहतूक करण्याचा एसटीचा केविलवाना प्रयोग आता थांबवण्यात आला पाहिजे. यापुढे दरवर्षी पाच हजार याप्रमाणे येत्या पाच वर्षात २५ हजार बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्याचे आमचे नियोजन असून यंदा किमान आठ हजार बसेस तफ्यात दाखल होतील, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, जुन्या बसेस चालू ठेवल्यामुळे त्यांच्या दुरुस्ती व देखभालीचा खर्च वाढतो. इंधनाचा अतिरिक्त वापर होतो. तसेच प्रदूषण देखील वाढते. त्यामुळे या बसेस चलनातून काढून टाकून त्या ठिकाणी नवीन बसेस दाखल करणे, नेहमीच श्रेयस्कर असते. तसेच या नवीन बसेस प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यामुळे एसटीपासून दुरावलेला प्रवासी वर्ग देखील पुन्हा एसटीकडे भविष्यात वळू शकतो. त्यामुळे एसटीच्या उत्पन्न वाढीला चालना मिळते.

सध्या २ हजार ६४० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी १२०० बसेस एसटीच्या ताफ्यात आतापर्यंत दाखल झाले आहेत. या बरोबरच नव्याने घेतल्या जाणाऱ्या तीन हजार बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून या बसेस देखील दिवाळीनंतर एसटीच्या ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात होईल. त्यामध्ये दोन महानगरांना जोडण्यासाठी २०० वातानुकूलित शयनयान बसेस देखील घेण्यात येणार आहेत.

सन्मानासह अखेरच्या प्रवासासाठी जे.जे. रुग्णालयात EV शववाहिनी

 

तसेच आदिवासी पाड्यापर्यंत एसटी पोहोचली पाहिजे, याकरिता सात मीटर लांबीच्या मिनी बसेस देखील घेतल्या जातील. याचवर्षी आणखी पाच हजार बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे येथे एक वर्षांमध्ये एसटीच्या ताब्यात सुमारे आठ हजार नवीन बसेस दाखल होतील, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *