मुख्य बातम्याशहर

Environment:शाडूची मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांना विविध परवानग्या वेळेत मिळतील – मुंबई महानगरपालिकाचे आश्वासन

मूर्तिकारांच्या सूचनांचा महानगरपालिका प्रशासनाकडून सकारात्मक विचार करून सहकार्य केले जाईल

मुंबई :

गणेशोत्सव २०२५ पर्यावरणपूरक (Environment) पद्धतीने साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मूर्तिकारांना मंडपाकरीता मोफत जागा पुरवित आहे. तसेच मूर्ती घडविण्यासाठी लागणारी पर्यावरणपूरक शाडू माती देखील मूर्तिकारांना मोफत देण्यात येत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महानगरातील मूर्तिकारांनीही महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे. मूर्तिकारांच्या सूचनांचा महानगरपालिका प्रशासनाकडून सकारात्मक विचार करून सहकार्य केले जाईल, असे आश्वासन उप आयुक्तप (परिमंडळ दोन) तथा गणेशोत्सव समन्वयकप्रशांत सपकाळे यांनी दिले. तसेच एक खिडकी योजनेतून मूर्तिकारांना देण्यात येणाऱ्या विविध परवानग्या वेळेत देण्यात येतील, असे आश्वासनही सपकाळे यांनी दिले.

परळस्थित महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात मूर्तिकार संघटनांची समन्वय बैठक पार पडली. मूर्तिकारांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा उप आयुक्त (परिमंडळ दोन) तथा गणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे यांनी या बैठकीत आढावा घेतला. उच्च न्यायालयाचे आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडाळाच्या मार्गदर्शक सुचना यानुसार पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करीत आहे.

त्यानुसार ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर मूर्तिकारांना मंडपांसाठी जागा आणि शाडू माती मोफत पुरवित आहे. या सुविधांचा वापर करून मूर्तिकारांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्ती तयार करून पर्यावरणपूरक पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन या बैठकीत उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे. तसेच मूर्तिकारांच्या समस्या प्रशासकीय विभाग (वॉर्ड ऑफिस) स्तरावर सोडविण्यात येतील, असेही सपकाळे यांनी सांगितले.

मूर्तिकारांच्या सूचनाही सपकाळे यांनी या बैठकीत जाणून घेतल्या. यामध्ये मंडप परवानगी मूर्तिकारांना लवकरात लवकर देण्यात येईल, असे आश्वासन सपकाळे यांनी दिले. तसेच मूर्तिकारांना मंडपामध्ये पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, मूर्तिकारांना मंडपासाठी परवानगी देताना पोलीस विभागाशी समन्वय साधणे, आधी विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली.

Local Train:बदलापूर स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी

 

मूर्तिकारांच्या सूचनांचा महानगरपालिका प्रशासनाकडून सकारात्मक विचार करून सहकार्य केले जाईल, असे आश्वासन सपकाळे यांनी दिले. उप आयुक्त (पर्यावरण) ताम्हाणे म्हणाले की, मूर्तिकारांनी महानगरपालिकेकडून मिळणाऱया सुविधांचा वापर करून हा उत्सव साजरा करताना पर्यावरण संवर्धनाचा सुवर्णमध्य साधावा.

पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करताना यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोकण विभागीय आयुक्तांना देखील पत्र पाठवून कोकण महसूल विभागातील जिल्ह्यांमध्ये पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यासाठी मूर्तिकारांना प्रोत्साहन द्यावे, शाडूची माती उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने मुंबईतील मूर्तिकारांना देखील तशा सुविधा देण्यात येत आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *