आरोग्यशहर

Hospital:दुर्मिळ कॉन्‍जेनिटल डायफ्राग्‍मेटिक हर्नियासह को-मोर्बिडीटीजवर यशस्‍वीरित्‍या उपचार केले

प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही संस्था परवडण्याजोगी, उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरविण्याची हमी देते.

मुंबई :

नारायणा हेल्‍थ एसआरसीसी चिल्‍ड्रन्‍स (Hospital) हॉस्पिटल, मुंबईने २० महिन्‍याच्‍या तान्‍ह्या मुलीवर कॉन्‍जेनिटल डायफ्रामॅटिक हर्निया (सीडीएच)च्‍या दुर्मिळ व गुंतागूंतीच्‍या केसवर यशस्‍वीरित्‍या उपचार केले. हॉस्पिटलमध्‍ये आणले तेव्‍हा तिची प्रकृती गंभीर होती. तिच्‍यावर सुरूवातीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्‍ये उपचार करण्‍यात आले होते, पण त्‍यामधून तिला आराम मिळाला नाही.

श्वसनाचा तीव्र त्रास होत असलेल्या आणि सतत ऑक्सिजन सपोर्टची गरज असलेल्या या तान्‍ह्या मुलीला रुग्णवाहिकेतून नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्‍स हॉस्पिटलमधील आपत्कालीन विभागात नेण्यात आले. पेडिएट्रिक सर्जरीचे कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. रसिक शाह यांच्या देखरेखीखाली सीटी अँजिओग्राफी आणि नियमित रक्‍त चाचण्यांसह त्वरित तपासणी करण्‍यात आली.

लहान शहरात केलेल्या मागील शस्‍त्रक्रियेमुळे या समस्‍येचे निराकरण झाले नाही आणि मुलीची प्रकृती आणखी बिघडली. मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये पुन्‍हा तपासणी केल्यावर दिसून आले की, यकृतापासून छातीच्‍या भागापर्यंत मोठा हर्निया झाला होता, ज्यामुळे गुंतागूंत निर्माण झाली होती.

यकृताच्या नसांचे (जेथे रक्‍तवाहिनी असामान्यपणे वळलेली किंवा वाकलेली असते) किंकिंग आणि इनफिरियर व्हेना कावा (आयव्‍हीसी) यामुळे यकृत पोटात रिपोझिशन करण्याचे प्रयत्‍न अयशस्वी झाले, ज्यामुळे नसा पूर्ववत होण्‍यावर परिणाम झाला.

डॉ. अशोक थोरात (सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट – लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लाण्‍ट अँड एचपीबी सर्जरी), डॉ. सूनू उदानी (क्रिटिकल केअर अँड इमर्जन्‍सी सर्विसेसचे मेडिकल डायरेक्‍टर व प्रमुख), डॉ. अयोन सेनगुप्‍ता (सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट – क्रिटिकल केअर मेडिसीन), डॉ. प्रदीप कौशिक (सीनियर कन्‍सल्‍ण्‍ट – पेडिएट्रिक कार्डियक सर्जरी) आणि डॉ. नंदिनी दवे (सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट – पेडिएट्रिक अॅनेस्‍थेसियोलॉजी) या बहुआयामी टीमने बैठक घेऊन सविस्तर उपचार योजना आखली. यकृताचे विच्छेदन आणि डायफ्राम दुरुस्ती शक्य असलेल्या थोरॅको-अॅबडोमिनल दृष्टिकोनाचा वापर करून दुसरी शस्‍त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शस्‍त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि डायफ्राम जाळीसह मजबूत करण्यात आला. मुलीला व्हेंटिलेटर सपोर्टवर पेडिएट्रिक इंटेन्सिव्‍ह केअर युनिट (पीआयसीयू)मध्‍ये हलवण्यात आले आणि तीन दिवसांनी बाहेर काढण्यात आले. पुढच्या आठवड्यात, तिला व्‍हेंटिलेटरवरून काढण्‍यात आले आणि पूर्ण आहार सुरू केला.

शस्‍त्रक्रियेनंतर दोन आठवडे तिला हॉस्पिटलमध्‍ये देखरेखीअंतर्गत ठेवण्‍यात आले, ज्‍यानंतर रुग्णाला स्थिर स्थितीत डिस्चार्ज देण्यात आला, जेथे अतिरिक्‍त ऑक्सिजनची आवश्यकता नव्हती. ४५ दिवसांनंतर फॉलो-अपमध्ये तिचे वजन ६०० ग्रॅम वाढले होते आणि ती बरी होण्याची चिन्हे दाखवत होती.

पेडिएट्रिक सर्जरीचे सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. रसिक शाह, नारायणा हेल्‍थ एसआरआरसी चिल्‍ड्रन्‍स हॉस्पिटल, मुंबई म्‍हणाले, ”या केसमधून गुंतागूंतीच्‍या पेडिएट्रिक स्थितींचे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये सहयोगात्‍मक, बहुआयामी केअरचे महत्त्व दिसून येते. उजव्या बाजूच्या डायफ्रामॅटिक हर्नियामध्ये यकृत काढून टाकण्याची आवश्यकता अत्यंत दुर्मिळ आहे आणि आमच्या माहितीनुसार, सायण्टिफिक मेडिकल लिटरेचरमध्‍ये अशा केसची नोंद नाही.”

नारायणा हेल्‍थ एसआरआरसी चिल्‍ड्रन्‍स हॉस्पिटल, मुंबई चे फॅसिलिटी डायरेक्‍टर डॉ. झुबिन परेरा म्‍हणाले, ”आमच्‍या टीमचे कौशल्‍य आणि सहयोगी दृष्टिकोनाने ही शस्‍त्रक्रिया यशस्‍वी केली. आम्‍हाला या तान्‍ह्या मुलीला पूर्णपणे बरे करण्‍यास मदत करण्‍याचा अभिमान वाटतो.”

नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मुंबई बाबत

नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मुंबई ही २०७ बेड्सची सुविधा असलेली अव्वल दर्जाची पीडियाट्रिक हेल्थकेअर संस्था आहे. येथे तान्ह्या बाळांना, तसेच लहान व किशोरवयीन मुलांना अतुलनीय, सर्वसमावेशक, जागतिक दर्जाची देखभाल पुरविली जाते.

हॉस्पिटलमध्ये पुरविल्या जाणाऱ्या पीडियाट्रिक स्पेशालिटीजमध्ये क्रिटिकल केअर; आपत्कालीन सेवा, कार्डिओलॉजी, कार्डिअॅक सर्जरी, ऑर्थोपेडिक्स आणि स्पाइन सर्जरी, पीडीअॅट्रिक सर्जरी, बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट, ऑप्थॅल्मोलॉजी, डर्मेटोलॉजी, न्यूरोसर्जरी, न्यूरोलॉजी, ईएनटी, नॅनोटेक्नोलॉजी, निओनेटल सर्जरी, गॅस्ट्रोएंटेरोलॉजी; हिपॅटोलॉजी, क्लिनिकल हिमॅटोलॉजी; हिमॅटो-ऑन्कोलॉजी, कार्निओ-मॅक्सिलो फेशियल सर्जरी, थोरॅसिस; व्हॅस्क्युलर सर्जरी, पीडियाट्रिक मेडिसीन, एंडोक्रिनोलॉजी, नेफ्रोलॉजी, मेडिकल जेनेटिक्स, सायकियाट्री, सायकोलॉजी, डेव्हलपमेंटल पीडियाट्रिक्स, र्हुमॅटोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, ऑन्को सर्जरी आणि पल्मोनोलॉजी यांचा समावेश आहे.

सन्मानासह अखेरच्या प्रवासासाठी जे.जे. रुग्णालयात EV शववाहिनी

 

प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही संस्था परवडण्याजोगी, उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरविण्याची हमी देते. तसेच एकाच छताखाली प्राथमिक, आपत्कालीन आणि गुंतागूंतीच्या वैद्यकीय उपचारांची गरजांची पूर्तता करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *