
ठाणे :
महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे १ ते ८ मे दरम्यान ठाणे प्रिमियर लीग (Thane League) २०२५ आयोजन करण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रंगणाऱ्या या लीगचे यंदा १३ वे वर्ष असून आयपीएल आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू लीगमध्ये खेळणार असल्याने ठाणेकरांना रंगतदार लढती पहायला मिळणार असल्याचे महाराष्ट्र माझा सेवा संस्थेचे सल्लागार विकास रेपाळे यांनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आठ दिवस रंगणाऱ्या या लीगमध्ये १६ संघाना सहभाग देण्यात आला आहे. त्यात एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ आणि ब संघ, एसआरएस ग्रुप, एफटीएल एकादश, स्पोर्ट्समन क्रिकेट क्लब, यूनियन क्रिकेट क्लब, गोल्डन स्टार क्रिकेट क्लब, ए टी स्पोर्ट्स ग्रुप, अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब, बेनेटन क्रिकेट क्लब, साळगावकर क्रिकेट क्लब, ठाणे वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी, स्पोर्टसमन क्रिकेट अकॅडमी, बॉईज क्रिकेट क्लब, महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी, सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकॅडमी आणि सालुदूर एन एम आदी संघाचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र माझा सेवा संस्थेचे सल्लागार विकास रेपाळे यांनी दिली.
स्पर्धेदरम्यान एकूण चार लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार असून विजेत्यांना एक लाख एक हजार रुपये आणि उपविजेत्यांना ६१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येईल. याशिवाय सर्वोत्तम फलंदाज, क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस गौरवचिन्ह आणि रोख बक्षिस देण्यात येणार आहे.
स्पर्धेतील उपांत्य फेरी आणि अनेक दर्जेदार अंतिम फेरीची लढत प्रकाश झोतात खेळवण्यात येईल. या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे, मुंबईतील आघाडीच्या क्रिकेटपटूंचा खेळ मोफत जवळून बघता येणार असल्याने ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी स्पर्धेसाठी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन महाराष्ट्र माझा सेवा संस्थेचे सल्लागार विकास रेपाळे यांनी केले आहे.
एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
आयपीएलमधील खेळाडूंचा सहभाग
या संघामधून आयपीएल खेळलेले अखिल हेरवाडकर, अंकित चव्हाण, शम्स मुलानी ऑस्टन डायस, तनुष कोटीयन, विनायक सामंत, आकाश पारकर, सुवेद पारकर, हार्दिक तामोरे, परिक्षित वळसंगकर, विद्याधर कामत, शशिकांत कदम, अथर्व अंकुलेकर, सौरभ सिंग, चिन्मय सुतार, जय बिस्त, प्रग्नेश कनपिलेवार, प्रज्ञेश कानपिळे, कल्पेश सावंत, वरुण लवंडे, सुमित ढेकळे, योगेश पवार, शोएब शेख, साईराज पाटील, प्रशांत सोलंकी हे क्रिकेटपटू खेळणार आहेत.