
दागिने हा महिलांच्या फॅशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. (Caution) महिला वेगवेगळ्या आऊटफिटसोबत वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालतात. काही जणी सोन्याचे, हिऱ्याचे दागिने घालतात तर काही जणी कृत्रिम. आता बाजारात अनेक प्रकारचे कृत्रिम दागिने आले आहेत. जसे की कुंदन ज्वेलरी, पर्ल ज्वेलरी आणि ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी.
यापैकी एक म्हणजे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी जिला सध्या खूप पसंती मिळताना आपल्याला पाहायला मिळते. कानातल्यांपासून ते नेकलेसपर्यंत, सर्व काही ऑक्सिडाइज्ड स्वरूपात उपलब्ध आहे. यामुळेच सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचेच हे दागिने आवडते बनत चालले आहेत. पण जर तुम्ही हे दागिने खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुमचे नुकसान देखील होऊ शकते. यासाठीच जाणून घेऊयात काही सोप्या टिप्स.
क्वालिटी करा चेक
सध्या तुम्हाला बाजारात विविध प्रकारचे ऑक्सिडाइज्ड दागिने मिळतील. त्यामुळेच अशा परिस्थितीत त्यांची गुणवत्ता तपासणे खूप महत्वाचे आहे. कारण जर ते निकृष्ट दर्जाचे असतील तर त्यामुळे त्वचेवर पुरळ आणि ऍलर्जी होऊ शकते. म्हणून, जेव्हाही तुम्ही ऑक्सिडाइज्ड दागिने खरेदी करता तेव्हा ते कोणत्या धातूचे बनलेले आहे ते तपासून घ्या. त्याला गंज चढला असेल तर असे दागिने अजिबात घेऊ नका.
वॉरंटी आहे आवश्यक
शक्य असल्यास, फक्त ब्रँडेड दुकानातूनच ऑक्सिडाइज्ड दागिने खरेदी करा. कारण असे वितरक तुम्हाला दागिन्यांची वॉरंटी किंवा गॅरंटी कार्ड देतील. जर भविष्यात दागिन्यांमुळे तुमच्या त्वचेला काही नुकसान झाले तर तुम्ही याची तक्रार देखील करू शकाल.
वजनाकडे द्या लक्ष
ऑक्सिडाइज्ड दागिने खरेदी करताना, त्याच्या वजनाकडे जरूर लक्ष द्या. कारण स्वस्त आणि स्थानिक दागिने खूपच जड असतात. याउलट जर तुम्ही कोणत्याही ब्रँडकडून असे दागिने विकत घेतले तर ते फक्त दिसायला जड असतील आणि घालायला खूप हलके असतील. म्हणून, नेहमी चांगल्या दुकानातूनच ऑक्सिडाइज्ड दागिन्यांची खरेदी करावी.
‘युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ एकेडमी’ (उमला) ची ऐतिहासिक कामगिरी; आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेत उपविजेतेपद
रंगांकडे द्या लक्ष
ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा रंग सहसा गडद राखाडी असतो. पण जास्त काळ हवेत ठेवल्यास त्याचा रंग काळा होऊ शकतो. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही ऑक्सिडाइज्ड दागिने खरेदी करता तेव्हा त्यांच्या रंगांकडे विशेष लक्ष द्या. जर दुकानदार तुम्हाला काळ्या रंगाचे दागिने देत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तो तुम्हाला जुने दागिने विकत आहे.