
मुंबई :
आरटीई (RTE Update) कायद्याअंतर्गत सुरू असलेल्या बालकांच्या प्रवेशाची तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर झाली असून त्यामध्ये एकूण २ हजार ४८२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील तिसर्या फेरीतील प्रवेशाला सुरुवात करण्यात आली.
आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यातील आठ हजार ८६३ शाळांमध्ये १ लाख ९ हजार १०२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ३ लाख ५ हजार १५१ अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे १ लाख १ हजार ९६७ विद्यार्थ्यांना मिळाला होता. त्यानंतर १० मार्चपर्यंत ६९ हजार ६९३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. दुसरी प्रतिक्षा यादीही सुरु करण्यात आली या फेरीत ४ हजार ८१५ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतले आहे.
आता तिसरी फेरी सुरु करण्यात आली त्यामध्ये एकूण २ हजार ४८२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पहिल्या दिवशी १०० हून अधिक प्रवेशही झाले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणार्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी साधारण चार फेर्या राबविण्यात येणार आहेत.
अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा असे आवाहन करण्यात आले आहे.
समायोजनाने मुंबईबाहेर न जाण्याचा मुंबईतील शिक्षकांचा निर्धार
फेरीनिहाय प्रवेश असे…
पहिली नियमित फेरी -६९,६९३
पहिली प्रतीक्षा यादी- १२,०४८
दुसरी प्रतीक्षा यादी -४,८१५
तिसरी प्रतिक्षा यादी सुरु आहे
राज्यस्तरीय आकडेवारी:
शाळा: ८८६३,
एकूण जागा: १,०९,१०२
अर्ज: ३,०५,१५१
प्रवेश : ८६,६४०
शिल्लक जागा: २२४६२