
ठाणे :
गोलंदाज आणि फलंदाजांच्या एकत्रित कामगिरीच्या जोरावर एकनाथ शिंदे (Sports) क्रिकेट क्लब ब संघाने साळगावकर स्पोर्ट्स क्लबचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित उपमुख्यमंत्री चषक ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मोठ्या विजयाची नोंद केली.
गोलंदाजांनी साळगावकर स्पोर्ट्स क्लबला १०१ धावांत गुंडाळल्यावर चिन्मय सुतारने नाबाद ७५ धावा करत संघाला २ बाद १०४ धावांसह विजय मिळवून दिला.
नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय साळगावकर स्पोर्ट्स क्लबला फायदेशीर ठरला नाही. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाच्या गोलंदाजांनी नियंत्रित मारा करत प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला.
१६ धावा करणारा कुणकेश पाटील संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. प्रणव टिल्लूने १५ धावा बनवल्या. अमित पांडेय, हेमंत बुचडे आणि कर्ष कोठारीने प्रत्येकी दोन बळी मिळवले.
या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या चिन्मय सुतारने २९ चेंडूत १० चौकार आणि चार षटकार ठोकत संघाला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला . विकी पाटीलने नाबाद ११ धावा केल्या. या डावात प्रणव टिल्लू आणि रोनित रमेशने प्रत्येकी एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक :
साळगावकर स्पोर्ट्स क्लब : १९ षटकात सर्वबाद १०१ ( कुणकेश पाटील १६, प्रणव टिल्लू १५, परेश घाणेकर १३, अमित पांडेय ३-१३-२, हेमंत बुचडे २-११-२ कर्ष कोठारी ४-१९-२, अमन खान २-२१-१, देव पटेल ४-१७-१ ) पराभूत विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) : ७.५ षटकात २बाद १०४ ( चिन्मय सुतार नाबाद ७५ ,विकी पाटील नाबाद ११, प्रणव टिल्लू २-२३-१, रोनित रमेश २.५ -३५-१).