मुख्य बातम्याशिक्षण

CET Exam:एमएचटी सीईटीच्या ५ मे रोजी होणाऱ्या फेर परीक्षेसाठी सीईटी सेल सज्ज

प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे पर्याय बदलल्याने २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

मुंबई:

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नव्याने घेतल्या जाणाऱ्या ५ मे रोजी होत असलेल्या पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवारी जारी केले असून २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांपैकी शुक्रवार सायंकाळपर्यंत २२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड करुन घेतल्याची माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली.

एमएचटी सीईटी परीक्षेतच्या पीसीएम गटातील २७ एप्रिल रोजी एका सत्रातील गणित विषयाच्या ऑनलाइन प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे पर्याय बदलल्याने २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. यामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा ५ मे रोजी पुन्हा घेतली जाणार आहे.

इंग्रजी, मराठी आणि उर्दू या तीन भाषांमध्ये होत असलेल्या या परीक्षेतील मराठी भाषेतील पेपर इंग्रजी भाषांतरित करताना प्रश्नांच्या पर्यायांची अदलाबदल झाल्याचे हा गोंधळ झाल्याने या सत्रातील सर्व उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने ही परीक्षा घेतली जात आहे.

यामुळे पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवारी दुपारीच संकेतस्थळावर जारी केले असून २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांपैकी शुक्रवार सायंकाळपर्यंत २२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड करुन घेतल्याची माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली. परीक्षा देऊन गावी गेलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला पुन्हा मुंबईला यावे लागले आहे. जे विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर मुंबई ठाणे व पुण्यातून आपापल्या गावी गेले आहेत त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याच्याही तक्रारी आहेत.

बदलेल्या वेळापत्रकात ७९.०९ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

नीट परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेने एलएलबी तीन वर्ष सीईटीसाठी यापूर्वी निश्चित केलेली परीक्षा केंद्र म्हणून ऐन वेळी निश्चित केल्याने विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाची ४ मे रोजी होणारी परीक्षा आज घेण्यात आली. या परीक्षेला नोंदणी केलेल्या ५७ हजार २९५ उमेदवारांपैकी ४५ हजार ३१५ उपस्थित राहिले. उपस्थितीचे प्रमाणे ७९.०९ टक्के इतके होते.११ हजार ९८०

विद्यार्थी गैरहजर राहिले.

पहिल्या सत्रात सकाळी ८:३० ते १०:३० या वेळेत, १२० परीक्षा केंद्रांवर एकूण १८ हजार ९७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १४,६८० विद्यार्थी उपस्थित राहिले. याचे उपस्थिती प्रमाण ७७.३७ टक्के होते. दुसऱ्या सत्रात, म्हणजे दुपारी १२:३० ते २:३० या वेळेत, १२१ केंद्रांवर १९,१९८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी १५,२६९ उपस्थित होते. याचे उपस्थिती प्रमाण ७९.५३ टक्के होते. तिसऱ्या सत्रात, म्हणजे संध्याकाळी ४:३० ते ६:३० या वेळेत, १२१ केंद्रांवर १९,१२३ उमेदवारांचे वेळापत्रक होते, त्यापैकी १५,३६६ विद्यार्थी उपस्थित होते. याचे उपस्थिती प्रमाण ८०.३५ टक्के होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *