मुख्य बातम्याशहर

समाजवादी विचारांच्या कामगार संघटनांचा एकजुटीचा निर्धार : समाजवादी नेते कपिल पाटील यांचा पुढाकार

मुंबई :

मुंबई आणि महाराष्ट्रातील समाजवादी विचारांच्या सर्वच कामगार संघटनांनी खासगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या विरोधात एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे. दादरच्या साने गुरुजी विद्यालयात मे दिनानिमित्त जॉर्ज फर्नांडिस प्रणित कामगार संघटनांच्या नेत्यांची एकत्रित बैठक हिंद मजदूर किसान पंचायतचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील यांनी बोलावली होती. ज्येष्ठ कामगार नेते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी सुभाष मळगी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

प्रस्थापित पक्ष सत्ताधारी वर्गाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे कामगार, कर्मचारी आणि कष्टकरी यांच्या बाजूने ते भूमिका घेत नाहीत. हे लक्षात घेऊन एक होण्याचं आवाहन कपिल पाटील यांनी केलं. समाजवादी विचारांच्या, जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेल्या कामगार संघटना स्वतंत्र स्वायत्त आहेत आणि राहतील. मात्र समाजवादाच्या मुद्द्यावर, कामगारांच्या हक्कांसाठी संयुक्तपणे काम करण्याची तयारी यावेळी उपस्थित नेत्यांनी दाखवली.

हिंद मजदूर किसान पंचायतचे महासचिव सुभाष मळवी, म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे नेते ॲड. सुरेश ठाकूर, प्राध्यापक संघटनेच्या नेत्या ताप्ती मुखोपाध्याय, मधू परांजपे, दी म्युनिसिपल युनियनचे रमाकांत बने, नवी मुंबई लेबर युनियनचे प्रफुल्ल म्हात्रे, म्युनिसिपल मजदूर युनियनचे कर्नल चंद्रशेखर रानडे, अनिल जाधव, म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे रमेश भुतेकर, सफाई कर्मचारी युनियनचे उत्तम गाडे, कर्मचारी घर कामगार संघटनच्या मधू बिरमोळे, बेस्ट कामगारांचे नेते रंगनाथ सातवसे, मुंबई मनपा बहुजन एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनचे डॉ. कैलास गौड, शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे, सुभाष मोरे, संगिता पाटील, कल्पना शेंडे, माथाडी युनियनचे अरुण रांजणे, बेस्ट कर्मचारी युनियनचे नितीन पाटील, म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे नवनाथ महाणवर, डोंबिवली म्युनिसिपल मजदूर युनियनचे अरविंद तांबे, ऑल इंडिया मिडिया एम्प्लॉईज असोसिएशनचे राजेंद्र दळवी, रेल मजदूर युनियनचे राजेंद्र सिंह, बँक कर्मचाऱ्यांचे नेते प्रकाश लोखंडे, मुंबई मनपा कर्मचारी नेते देविदास लोखंडे, अरविंद सावला, छात्र भारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *