मनोरंजन

शूट्सदरम्यान मला बदाम खायला आवडतात : सोहा अली खान

पुणे :

सोहा अली खान म्हणाल्या,जेव्हा मी घरी जेवण बनविण्याची तयारी करते, तेव्हा प्रोटीनला सर्वात वरचे स्थान असते. विशेषतः माझी मुलगी वाढत्या वयाची आणि खूप ऍक्टिव्ह असल्याने. बदाम हे आमच्यासाठी पोषणाचा सोपा आणि विश्‍वासार्ह स्रोत ठरले आहेत. शूट्सदरम्यान देखील मला बदाम खायला आवडतात. ते मला पचायला जड न वाटता एनर्जी देतात. मी माझ्या मुलीच्या आहारात, तिच्या नाश्त्यात किंवा सॅलडमध्ये देखील बदाम घालते. हा एक छोटा पण अर्थपूर्ण बदल आहे ज्यामुळे आपण दररोज पुरेशे प्रोटीन मिळवतो.असे वक्तव्य अल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाने पुण्यात अड्रेसिंग इंडियाज प्रोटीन गॅप : बेटर नुट्रीशन फॉर हेल्दीयर टुमारो’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात अभिनेत्री सोहा अली खान ने केले.

हा कार्यक्रमपुण्यातील रॅमी ग्रँड हॉटेल अँड स्पायेथे झाला आणि यामध्येअभिनेत्री सोहा अली खान, फिटनेस एक्स्पर्ट यास्मिन कराचीवाला आणि रितिका समद्दार (रीजनल हेड – डायेटेटिक्स, मॅक्स हेल्थकेअर, नवी दिल्ली)यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी सहभाग घेतला होता.

पॅनेलने भारतीय नागरिकांच्या पोषणातील प्रोटीन गॅपच्या(प्रथिनांची कमतरता) समस्येवर प्रकाश टाकला. आहारमधील छोटे छोटे बदल किती मोठी भूमिका निभावतात- रोज आहारात मूठभर बदाम खाण्याने सर्व वयोगटांतील लोकांसाठी प्रोटीन लेव्हल सुधारण्यात कशी मदत होऊ शकते हे त्यांनी अधोरेखित केले.सर्वांगीण वाढीस, आरोग्यास आणि ताकद वाढविण्यासाठी प्रोटीन अत्यावश्यक घटक आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, तरुणांना ऊर्जा मिळवण्यासाठी आणि प्रौढांना स्नायूंची दुरुस्ती व संपूर्ण आरोग्यासाठी प्रोटीनची गरज असते. तरीही भारतीय आहार या बाबतीत कमी पडतो. उदाहरणार्थ, एका बाऊल डाळीमध्ये सुमारे 18 ग्रॅम प्रोटीन असते, जे सक्रिय जीवनशैली असलेल्या किंवा जास्त पोषणाची गरज असलेल्या घरातील लोकांसाठी पुरेसे नसते.पॅनेलिस्ट्सनी असे सांगितले की संपूर्ण आहार बदलण्याची गरज नाही. फक्त आहारातील छोटे छोटे बदल – जसे की जेवणामध्ये किंवा नाश्त्यांमध्ये बदामांचे सेवन करणे परिणामकारक ठरू शकते.बदाम हे नैसर्गिक, प्लांट-बेस्ड प्रोटीन सोर्स आहेत, आणि 30 ग्रॅम सर्व्हिंगमध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिनेमिळतात. त्यासोबतच बदामांमध्येमॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि झिंकसारखी प्रतिकारशक्ती व आरोग्यासाठी आवश्यक पोषकतत्त्वेहीअसतात.

यास्मिन कराचीवाला म्हणाल्या,एक फिटनेस प्रोफेशनल म्हणून, मी नेहमी लोकांना एनर्जी, रिकव्हरी आणि स्ट्रेंथसाठी प्रोटीनचे असलेले महत्त्व सांगते. बदाम हे माझे नेहमीचे पर्याय आहेत कारण ते चांगल्या दर्जाचे प्लांट-बेस्ड प्रोटीन देतात, जे व्यायामानंतर/पोस्ट वर्कआऊट खूप उपयोगी पडतात. ते तुम्हाला तृप्त ठेवतात, त्यामुळे ते स्मार्ट स्नॅक चॉईस ठरतात. मी बदाम नेहमी बरोबर ठेवते, मग मी क्लायंट्सना ट्रेनिंग देत असेल किंवा शूटला जात असेल. बदाम शरीराला योग्य पोषण देण्याचा एक सोपा मार्ग आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *