मुख्य बातम्या

मुंबईतील जी.एस. महानगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत चुरशीची लढत, गीतांजली उदय शेळके यांच्या पॅनेलची एका जागेवर बिनविरोध निवड

सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलच्या प्रत्येक मेळाव्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली, आणि सोशल मीडियावरही या पॅनलला सकारात्मक प्रतिसाद

मुंबईच्या जी.एस. महानगर सहकारी बँकेच्या २०२५ मध्ये होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत नणंद-भावजयी यांच्या पॅनलमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. १६ मे पर्यंत अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलचे संतोष रणदिवे बिनविरोध निवडून आले आहेत.
स्व. उदयराव शेळके यांच्या पत्नी गीतांजलीताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी अनुभवली.
ही निवडणूक नणंद विरुद्ध भावजय अशी असली तरी, सुमनताई शेळके आणि स्मिताताई पटेल यांच्या गेल्या अडीच वर्षांतील संचालक मंडळाला डावलून घेतलेल्या निर्णयांवरून त्यांच्या कारभारावर चिंता व्यक्त होत आहे.

१ जून रोजी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले, परंतु स्मिता पटेल यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जुन्या जाणत्या संचालकांनी गीतांजलीताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलच्या प्रत्येक मेळाव्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली, आणि सोशल मीडियावरही या पॅनलला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
अनेक कार्यकर्ते उमेदवारीची अपेक्षा न करता गीतांजलीताई शेळके यांच्यासोबत राहण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.
संतोष रणदिवे यांच्या बिनविरोध निवडीने सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने विजयाची सुरुवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *