शिक्षण

अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर, २६ मेपासून सुरू होणार नोंदणी

मुंबई :

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर शिक्षण संचालनालयाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अर्ज नोंदणी व पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेला २६ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू करण्यात येणार आहे. २१ मे रोजी आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर शिक्षण संचालनालयाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले.

दहावीच्या निकालानंतर शिक्षण संचालनालयाकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अकरावी प्रवेश प्रक्रियेला २१ मेपासून सुरुवात करण्यात आली. २१ मे ते १३ जूनदरम्यान होणाऱ्या पहिल्या फेरीसाठी अर्ज नोंदणी व पसंतीक्रम व उच्च माध्यमिक विद्यालयांची अलॉटमेंट इत्यादीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र २१ मे २०२५ रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ हे सकाळपासून तांत्रिक कारणास्तव बंद पडले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले हाते. त्यामुळे तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यासाठी लागणारा कालावधी आणि विद्यार्थी हित लक्षात घेत अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी दुपारी ४ वाजता शिक्षण संचालनालयाकडून अकरावी प्रवेशासाच्या पहिल्या फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा २६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

अखेर दोन वर्षानंतर ‘त्याने’ गिळला सुखाचा घास

अकरावी प्रवेशाचा अर्ज भरताना पहिल्या दिवशी आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करणे शक्य झाले नाही. मात्र शिक्षण संचालनालयाने २२ मे रोजी दुपारी ३ वाजता पहिल्या फेरीसाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक हे दुपारी ३ वाजल्यापासून अर्ज भरण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र संकेतस्थळ सुरूच होत नसल्याने त्यांना अर्ज भरणे शक्य झाले नाही. अखेर शिक्षण संचालनायालने अर्ज भरण्यास २६ मे रोजी सुरूवात होणार असल्याचे स्पष्ट केल्याने विद्यार्थी व पालकांनी अर्ज भरण्याची धडपड बंद केली.

पहिल्या फेरीचे सुधारित वेळापत्रक

  • प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी व प्राधान्यक्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया अर्ज सुरू – २६ मे ते ३ जून
  • विद्यार्थी महाविद्यालयांचा प्राधान्यक्रमाच्या भरणे – २६ मे ते ३ जून
  • तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर – ५ जून
  • तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थ्यांनी हरकती नोंदवणे – ६ जुन
  • सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर – ८ जून
  • अल्पसंख्याक, इन-हाउस, व्यवस्थापन कोटा प्रवेश – ९ ते ११ जून
  • पहिली यादी जाहीर – १० जून
  • विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश – ११ ते १८ जून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *