शिक्षण

आयटीआय प्रवेशासाठी २६ मे पासून विद्यार्थ्यांना भरता येणार पसंतीक्रम

मुंबई :

आयटीआय ऑनलाईन प्रवेश नोंदणीला सुरुवात झाली असून अवघ्या पाच दिवसांत ३२ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरायचा आहे. २६ मे पासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे.

यंदा प्रवेशासाठी ४१९ शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार व ५८८ अशासकीय आयटीआयमध्ये ६१ हजार अशा एकूण १ लाख ५४ हजार जागा उपलब्ध आहेत. यामध्ये एक वर्षाच्या कालावधीचे ४४ अभ्यासक्रम व दोन वर्षाच्या कालावधीचे ३६ अभ्यासक्रम असून प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत. https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळ अर्ज भरता येणार आहे. तसेच प्रवेशासंबंधीची सविस्तर माहिती, नियमावली आणि मार्गदर्शक पुस्तिका देखील तेथे उपलब्ध आहे. यानंतर प्रथम फेरीसाठी आपल्या पसंतीचे व्यवसाय व संस्था निवडण्यासाठी आवश्यक ते पर्याय सादर करता येणार आहे. यासाठी ‘ऑप्शन फॉर्म’ भरण्यास २६ मे पासून सुरुवात होणार आहे. गेल्या पाच दिवसात ३१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी २५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज अंतिम केला आहे. तर यापैकी २४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरले आहे.

 सिंधुदुर्गच्या सुपुत्राचे दातृत्व; मुख्यमंत्र्यांकडे वीस लाखांचा निधी सुपूर्द

प्रवेश अर्ज भरल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता जाहीर होईल यानंतर विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत दिली जाणार असून त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

अर्ज केलेला तपशील

  • नोंदणी केलेले विद्यार्थी : ३१,११९
  • अर्ज पूर्ण : २५,९६६
  • शुल्क भरलेले : २४,८१०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *