मुख्य बातम्या

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

माटुंगा -मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर : ट्रान्स हार्बर मार्गावरही ब्लॉक

मुंबई : 

अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मुख्य मार्गावर माटुंगा -मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील आणि नंतर माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल आपल्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. तर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.

ब्लॉक काळात वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन लाईन सेवा आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाणेसाठी सुटणाऱ्या अप लाईन सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना दिलासा रविवारचा मेगाब्लाॅक रद्द

पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते बोरिवली स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते रात्री ३ वाजेपर्यंत ३.३० तासांचा ब्लाॅक असेल. तर, भाईंदर ते बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ब्लाॅक असेल. ब्लाॅक कालावधीत विरार/वसई रोड आणि बोरिवली स्थानकादरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या कालावधीत काही लोकल रद्द असतील. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नसेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *