शिक्षण

एसएनडीटी विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू, १४ जूनपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई :

एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालये आणि एसएनडीटी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि एस.सी.बी. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयामध्ये विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिये सुरुवात झाली असून, विद्यार्थींंनीना १४ जून २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एसएनडीटी विद्यापीठातील अभ्यासक्रमांची नोंदणी https://sndt.digitaluniversity.ac/ या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येत आहे. विद्यापीठांतर्गत कला शाखेच्या इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, संगीत, आर्ट अँड पेंटिंग अभ्यासक्रम आणि वाणिज्य शाखेअंतर्गत अप्रेंटनशिप इम्बेडेड कोर्सेस, बँकिंग व वित्तीय व्यवस्थापन, क्रिप्स बाफी, कंप्यूटर एप्लिकेशन, पर्यटन, तसेच विज्ञान शाखेतील बी.एससी. आय.टी., मॅथ्स, व्यवस्थापन शाखेतील बी.एम.एस. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठांतर्गत पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थींनींना १४ जून २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर २० जून २०२५ रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

सीबीएसई शाळेत आता मातृभाषेतून धडे

एसएनडीटी महिला विद्यापीठांतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थींनींना कौशल्य विकास, संशोधन, चेतना कोर्सेस व उद्योजकता विकास, विद्यार्थीमुख अध्यापन व तज्ज्ञ प्राध्यापक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत अभ्यासक्रम रचना, क्षेत्रभेटी, कार्यशाळा व प्रकल्प शिक्षण, शिष्यवृत्ती व आर्थिक सहाय्य उपलब्ध, अद्ययावत व्यायामशाळा, वसतिगृह, कौन्सिलिंग सेवा आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच एनसीसी, एनएसएस, सांस्कृतिक कार्यक्रम व १२ पेक्षा अधिक क्रीडा प्रकारांमध्ये सक्रिय सहभागी घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *