
मुंबई
तांत्रिक अडचणी पार करीत राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या इयत्ता अकरावी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील ९ हजार ३३८ कनिष्ठ महाविद्यालयातील १८ लाख ७४ हजार ९३५ जागांवर सांयकाळी ८ पर्यंत २ लाख ५८ हजार ८८७ नोंदणी केली असून ८३ हजार ७२४ अर्ज भरुन प्रवेश शुल्क भरले आहे. तर ७० हजार ७३९ विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग लॉक केला आहे तर २४ हजार ७२१ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग लॉक केला आहे.
दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेला दोन दिवसाच्या सरावानंतर संकेतस्थळ सुरु करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात प्रवेशाच्या संकेतस्थळाला तांत्रिक अडचणी आल्या. या तात्रिक अडचणीनंतर सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नोंदणी व प्राधान्यक्रम निश्चितीसह सोमवारपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत राज्यातील २ लाख ५७ हजार ११५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ८३ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे, ७०,१४७ जणांनी अर्जाचा पहिला भाग लॉक केला आहे आणि २४ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग २ लॉक केला आहे. राज्याबाहेरील १ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ६९८ जणांनी शुल्क भरले आहे, ५९२ विद्यार्थ्यांनी भाग १ लॉक केला आहे आणि २०३ जणांनी भाग २ लॉक केला आहे. सर्व मिळून २ लाख ५८ हजार ८८७ नोंदणी केली असून ८३ हजार ७२४ अर्ज भरुन प्रवेश शुल्क भरले आहे. तर ७० हजार ७३९ विद्यार्थ्यांनी अर्ज दोन लॉक केला आहे तर २४ हजार ७२१ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग लॉक केला असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली.
राज्यातील नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी राज्यातील ८३ हजार २६ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले. तर ७० हजार १४७ विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरला तर २४ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरला. तसेच राज्याबाहेरील नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६९८ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले. यातील ५९२ विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग तर २०३ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरला आहे.
संपूर्ण राज्यात यंदा प्रथमच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. १९ व २० मे रोजी विद्यार्थांना अर्ज भरण्यासाठी सरावाची संधी दिल्यानंतर २१ मे पासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. त्यापूर्वी दोन दिवस विद्यार्थ्यांना सरावाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी सकाळी आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा उडाला होता.
मुंबईतून ३७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
अकरावी प्रवेशासाठी २ लाख लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये मुंबईतून ३७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १६ हजार २६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरले. त्यातील १३ हजार २९७ विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पहिला टप्पा भरला, तर तीन हजार एक विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा दुसरा टप्पा भरला. अकरावीच्या पहिल्या दिवशी मुंबईतून सर्वाधिक ३७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्याखालोखाल ठाण्यातून २६ हजार ५८६, पुण्यातून २५ हजार ३९४, पालघरमधून १० हजार ६५३, अहिल्यानगरमधून ७ हजार ७९७ आणि नाशिकमधून ७ हजार ८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तसेच गडचिरोलीमधून सर्वात कमी ५१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.