
मुंबई
फुफ्फुस विकारांवरील आधुनिक आणि सखोल उपचारांसाठी सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने ‘अॅडव्हान्स्ड लंग डिझीज क्लिनिक’ची सुरुवात केली आहे. ही क्लिनिक दुर्मिळ आणि गंभीर फुफ्फुस विकारांच्या निदान, उपचार व दीर्घकालीन व्यवस्थापनासाठी समर्पित आहे.
भारतामध्ये जवळपास ३३ दशलक्ष अस्थमाचे रुग्ण आणि ५५ दशलक्ष COPD (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मनरी डिझीज) चे रुग्ण आहेत, असे लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन च्या अहवालानुसार म्हटले आहे. ही क्लिनिक अशा गंभीर रुग्णांसाठी आधुनिक निदान व उपचार सेवा, अगदी फुफ्फुस प्रत्यारोपण पर्यंत, एकाच छताखाली पुरवते.
या क्लिनिकमध्ये दिल्या जाणाऱ्या
विशेष सेवा:
गंभीर इंटरस्टिशियल लंग डिझीज (ILD) COPD व एम्फायसेमाचे अंतिम टप्प्यातील रुग्ण औषधांना प्रतिसाद न देणारे गंभीर अस्थमा पर्यावरणीय व व्यवसायाशी संबंधित फुफ्फुस विकार व्हेंटिलेटर किंवा ECMO ची गरज असलेले रुग्ण क्लिनिकमध्ये अत्याधुनिक ब्रॉन्कोस्कोपी, क्रायोथेरपी, एंडोब्रॉन्कियल अल्ट्रासाऊंड (EBUS) बायॉप्सी, आणि एअरवे स्टेंटिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तसेच पर्सनलाइज्ड फुफ्फुस पुनर्वसन, ऑक्सिजन थेरपी आणि जीवनशैली सल्ला देखील दिला जातो.
बहु-विशेषज्ञांचा एकत्रित दृष्टिकोन
कार्डिओलॉजी, रूमॅटोलॉजी, इंफेक्शस डिसीज व क्रिटिकल केअर यासारख्या विभागांमधील तज्ञ एकत्र काम करतात. फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम देखील येथे उपलब्ध असून त्यात प्री-ट्रान्सप्लांट मूल्यांकन, शस्त्रक्रिया, औषधोपचार व दीर्घकालीन देखरेख दिली जाते.डॉ. तारंग गिआंचांदानी, हॉस्पिटलच्या ग्रुप सीईओ म्हणाल्या, “ही क्लिनिक केवळ उपचारापुरती मर्यादित नाही, तर रुग्णांचा जीवनमान उंचावणारी आहे. या आधुनिक सुविधांमुळे गंभीर फुफ्फुस विकारांचा सामना करणे सोपे होईल.”
डॉ. सुशील बिंद्रू, डायरेक्टर पल्मनरी मेडिसिन, म्हणाले, “आम्ही लवकर निदान, आधुनिक वैद्यकीय व शस्त्रक्रियात्मक उपचार आणि शस्त्रक्रियेनंतरच्या काळजीवर भर देतो.”