
मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या संचार आणि पत्रकारिता विभागाने २०२५ साठी एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया जाहीर केल्या आहेत. विभागामार्फत दोन प्रमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत एम.ए. संज्ञापन आणि पत्रकारिता, आणि एम.ए. जनसंपर्क. हे दोन्ही अभ्यासक्रम दोन वर्षांचे असून, कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज http://muadmission.samarth.edu.in या लिंकवर जाता येईल.
संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग आहे भारतीय सर्वोत्तम पत्रकारिता शिक्षण संस्था मानली जाते. विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक विकासावर नम्रभर लक्ष केंद्रित करून हे अभ्यासक्रम उद्योग-केंद्रित आहेत. यामध्ये पत्रकारिता, जनसंपर्क, प्रसारमाध्यमे, डिजिटल मीडियाचे तंत्रज्ञान, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, ब्रँडिंग, मीडिया मॅनेजमेंट इत्यादी विविध क्षेत्रातील गहन अभ्यास व प्रशिक्षण दिले जाते. “आमचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उद्योगाशी जोडणारा पूल आहे. प्रात्यक्षिक शिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आम्ही त्यांना मीडिया क्षेत्रासाठी सज्ज करतो”, असे विभागप्रमुख प्रा. (डॉ) सुंदर राजदीप यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक बस पुरवठादार कंपनीसमोर एसटीच्या व्यवस्थापनाने पुन्हा एकदा गुडगे टेकले – श्रीरंग बरगे यांचा आरोप
विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक शिक्षण न देत, प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या कार्यशाळा, प्रकल्प, इंटर्नशिप्स व स्टुडिओ प्रशिक्षणाचीही संधी घेता घेता मिळते. या अभ्यासक्रमांसाठी देशभरातून विद्यार्थी प्रवेश घेतात. विभागातील प्राध्यापक हे विविध माध्यमांमध्ये काम केलेले अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मीडिया क्षेत्रातील व्यावसायिक गरजांनुसार तयार केले जाते. याशिवाय विभागाचे उद्योगजगतातील संपर्क नेटवर्क मजबूत असल्यामुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होतात.
इच्छुक विद्यार्थ्यांनी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती घ्यावी. अर्ज प्रक्रियेसंबंधीचे सर्व तपशील, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा विभागाच्या http://www.dcjmumbai.mu.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.