आरोग्य

१०० टक्के ब्लॅाकेजेस असलेल्या ७१ वर्षीय व्यक्तीवर ग्लेनईगल्स रुग्णालयात यशस्वी उपचार

मुंबई : 

परळच्या ग्लेनेगल्स हॉस्पिटलने १००% ब्लॉकेजेस झालेल्या धमन्यांवर यशस्वीरित्या चीप (CHIP – कॉम्प्लेक्स हाय-रिस्क इंटरव्हेंशनल प्रोसिजर) केले आहे, ही स्थिती बहुतेकदा अकार्यक्षम आणि जीवघेणी मानली जाते. हृदयाचे कार्य कमकुवत असलेल्या आणि कोमॅार्बिडीटीज असलेल्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या या प्रक्रिया रुग्णांकरिता फायदेशीर ठरत आहेत. प्रगत पायाभूत सुविधा, इंट्राव्हस्कुलर इमेजिंग सारख्या अत्याधुनिक साधनांसह आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत ग्लेनईगल्स हॉस्पिटलने उच्च-जोखीम असलेल्या रुग्णांना अँजिओप्लास्टीद्वारे नवे आयुष्य मिळवून दिले जात आहे. या प्रक्रियेनंतर रुग्ण कोणत्याही अडचणीशिवाय त्यांचे दैनंदिन कार्य पुर्ववत सुरू करू शकतात.

२०२१ मध्ये, ठाण्यात राहणाऱ्या एका ७१ वर्षीय पुरूषाला हृदयरोग असल्याचे निदान झाले तेव्हा त्याला आरोग्याच्या मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला. अँजिओग्राफी केल्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत उपचाराचा सल्ला दिला, परंतु रुग्णाने शस्त्रक्रिया टाळली. शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीची भीती वाटत होती, म्हणून वैद्यकीय व्यवस्थापनाचा पर्याय या रुग्णाने निवडला. पुढील चार वर्षे त्याने औषधोपचाराने त्याची स्थिती व्यवस्थापित केली. तथापि, २०२५ पर्यंत, त्याची तब्येत लक्षणीयरीत्या खालावली. स्थिती व्यवस्थापित करण्याची गरज भासली असून त्याच्या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करणे अधिक कठीण झाले. या आव्हानात्मक काळात त्याने हृदयरोगाच्या काळजीमध्ये तज्ञ म्हणून ओळखले जाणारे डॉ. राहुल गुप्ता यांची भेट घेतली. रुग्णाच्या आरोग्याचे मूल्यांकन केल्यानंतर, डॉ. गुप्ता यांनी रुग्णाला उपचारांबाबत विचार करण्याचा सल्ला दिला व यामध्ये वेळ अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये रुग्णाने यशस्वीरित्या चिप प्रक्रिया केली आणि आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. या रुग्णासारखे इतर अनेक रुग्ण आहेत ज्यांचे प्राण वेळेवर केलेल्या चीप प्रक्रियेमुळे वाचले आहेत.

हे नेहमीचे हार्ट ब्लॉकेज नव्हते. रुग्णाच्या रक्तवाहिन्या पूर्णपणे बंद होत्या, १००% ब्लॉकेजेस होते, ज्यामुळे ते उघडणे कठीण तसेच आव्हानात्मक होते. याशिवाय, या प्रकरणात तीव्र गुंतागुंत होती कारण रुग्णाच्या हृदयाचे कार्य बिघडले होते, इजेक्शन फ्रॅक्शन्स १५% पर्यंत कमी होते, ज्यामुळे तो कोणत्याही उपचाराकरिता उच्च-जोखीम होती. या आव्हानांवर मात करत रुग्णालयाच्या अत्याधुनिक बायप्लेन कॅथ लॅब, प्रगत हस्तक्षेपात्मक साधनांची उपलब्धता आणि कुशल बहुविद्याशाखीय टीममुळे सर्व रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. या रुग्णामध्ये आता हार्ट पंपिंग आणि ऱ्हदयाचे कार्य सुधारले असून रुग्णाच्या जीवनमानातही सुधार झाला आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान आणि जीवनशैलीतील घटकांसारख्या दीर्घकालीन आजारांमुळे हृदयासंबंधी अडथळे निर्माण होतात. लक्षणांमध्ये सहसा छातीत दुखणे, दम लागणे, थकवा येणे याचा समावेश असून बऱ्याच प्रकरणांमध्ये स्थिती गंभीर होईपर्यंत ते लक्षात येत नाही. या रुग्णांवर उपचार करणे हे केवळ त्यांच्या १००% ब्लॅाकेजेसमुळेच नव्हे तर त्यांचे ऱ्हदय कमकुवत असल्याने ते आव्हानात्मक होते. हे असे प्रकार आहेत जिथे बहुतेक केंद्रे रुग्णाला उच्च-जोखीम शस्त्रक्रियेसाठी पाठवतात किंवा दुर्दैवाने त्यांना नकार देतात. प्रगत अशा CHIP प्रक्रियेमुळे हे आव्हान यशस्वीरित्या पेलण्यात आले. ही प्रगत प्रक्रिया लोकांना नवे आयुष्य बहील करते अशी प्रतिक्रिया डॉ. राहुल गुप्ता (संचालक- इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी अँड स्ट्रक्चरल हार्ट प्रोग्राम, ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परळ, मुंबई) यांनी व्यक्त केली.

डॉ. राहुल पुढे सांगतात की, हे प्रगत CHIP प्रक्रिया सर्वच ठिकाणी केले जात नाहीत कारण त्यांना केवळ कौशल्यच नाही तर पायाभूत सुविधा आणि निर्णयाची आवश्यकता भासते. ज्या रुग्णांना एकेकाळी कोणतीही आशा नसल्याचे सांगण्यात आले होते ते आता भविष्याची अपेक्षा करू शकतात याची मला खात्री आहे.

मला विश्वास बसत नाही की मला जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे. मी यासाठी डॅाक्टर व त्यांच्या संपुर्ण टिमचे आभार मानतो. मी चार वर्षे लढलो, परंतु मी शेवटी उपचाराचा निर्णय घेऊन माझी लढाई जिंकली अशी प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *