मुख्य बातम्याशहर

तिन्ही रेल्वेवर रविवारी ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

मुंबई :

अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरही ब्लॉक असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

तसेच घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवरील थांबतील.

तसेच हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तर पनवेल येथून ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत आणि ठाणे येथून पनवेल येथे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत रद्द राहतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाशी विभागावर विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील. तर ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.

पश्चिम रेल्वेचा सांताक्रूझ आणि गोरेगाव दरम्यान ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ आणि गोरेगाव स्टेशन दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत, सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकादरम्यान सर्व धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गांवर चालवल्या जातील. त्यामुळे या गाड्या प्लॅटफॉर्मच्या अपुर्‍या लांबीमुळे विलेपार्ले येथे थांबणार नाहीत आणि जलद मार्गांवर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे राम मंदिर येथेही थांबणार नाहीत. तथापि, हार्बर मार्गावरील विले – पार्ले आणि राम मंदिर येथे सेवा उपलब्ध असतील. ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा रद्द राहतील आणि काही बोरिवली आणि अंधेरी गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत धावतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *