आरोग्य

मुंबईतील ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये होणार अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया 

मुंबई :

परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटलने गुडघा आणि हिप रिप्लेसमेंटसाठी अत्याधुनिक रोबोटिक-असिस्टेड सर्जरीचा नुकताच शुभारंभ केला आहे. यानिमित्ताने ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण आरोग्य क्रांती घडवून आणली जात आहे. हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान गुंतागुंतीची प्रक्रिया सुलभ करते.

हा कार्यक्रम अचूकतेने चालणाऱ्या ऑर्थोपेडिक उपचारांमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान शस्त्रक्रियेची अचूकता वाढविण्यासाठी, बरे होण्याचा कालावधी कमी करण्यासाठी आणि रुग्णांना उत्कृष्ट परिणाम प्राप्त व्हावे यासाठी तयार केले आहे, जे रुग्णालयाची वैद्यकिय उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेची हमी देते.

डॉ. अनुप खत्री, डॉ. गिरीश भालेराव, डॉ. श्रीधर आर्चिक, डॉ. एस. व्ही. वैद्य आणि डॉ. नीलकंठ धामनस्कर यांच्या नेतृत्वाखाली ऑर्थोपेडिक टीम याठिकाणी कार्यरत राहिली. रोबोटिक सिस्टीम सर्जनना प्रगत इमेजिंग तंत्राचा वापर करून वैयक्तिकृत शस्त्रक्रिया योजना तयार करण्यास सक्षम करते. या रोबोटीक प्रणालीद्वारे उपभोग घेणारी पहिली व्यक्ती म्हणजे ८० वर्षीय श्री. भरत चौहान, ज्यांना १५ वर्षांपासून दीर्घकालीन सांधेदुखीचा त्रास होता. २७ मे २०२५ रोजी त्यांच्यावर यशस्वी रोबोटिक नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. मला शस्त्रक्रियेची खरोखर भीती वाटत होती, परंतु तीव्र वेदनांमुळे माझ्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता. आता, मला असे वाटते की मला नवीन आयुष्य मिळाले. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी, मी वेदनामुक्त झालो. मी आता कोणत्याही आधाराशिवाय चालू शकतो अशी प्रतिक्रिया रुग्ण चौहान यांनी व्यक्त केली.

विरार येथील ४० वर्षीय संध्या सिंग या आणखी एका रुग्णाला पडल्यामुळे उजव्या पायाच्या लिगामेंटला गंभीर दुखापत झाली. तिच्या उजव्या पायावर रोबोटिक-असिस्टेड शस्त्रक्रिया आणि डाव्या पायावर पारंपारिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी या रुग्णाला चालणे देखील अशक्य होते. आता मात्र डॉ. गिरीश एल. भालेराव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या अचूक उपचारांमुळे आणि प्रगत रोबोटिक प्रणालीमुळे त्यांना पुन्हा पुर्वीसारखे चालता येऊ लागल्याची प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली.

परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटलचे सीईओ डॉ. बिपिन चेवले सांगतात की, आमच्या रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा प्रदान करणे हे आमचे ध्येय्य आहे. श्री. चौहान यांची यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया ही क्लिनिकल उत्कृष्टतेचे उत्तम उदाहरण आहे. रोबोटिक्ससह, आम्ही केवळ शस्त्रक्रियेची अचूकता वाढवत नाही तर रुग्णांना त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी जलद आणि अधिक आत्मविश्वासाने त्यांना पुर्ववत आयुष्य जगण्यासाठी सक्षम करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *