मुख्य बातम्याशहर

कुलाबा – वांद्रे – सीप्झ या मेट्रो-३ तिकिट मिळणार विविध ॲपवर

मुंबई :
कुलाबा – वांद्रेसीप्झ या मेट्रो-३ मार्गीकेचे (ॲक्वालाईन) तिकीट मिळवणे आणखी सोपे झाले आहे. मेट्रो ३ ओएनडीसी या डिजिटल नेटवर्कशी जोडली गेली आहे. यामुळे प्रवाशांना विविध अ‍ॅप्सवरून क्यू आर कोड तिकीट खरेदी करता येणार आहे.
मेट्रो ३ चे तिकीट प्रवाशांना EaseMyTrip, RedBus, Yatri, OneTicket यासारख्या अ‍ॅप्सवरून क्यू आर कोडच्या माध्यमातून घेता येणार आहे. ओएनडीसी नेटवर्क वरून तिकिट खिडकीवर न जाता मेट्रो ३ च्या प्रवाशांना तिकीट घेता येऊ शकते. EaseMyTrip, RedBus, Miles & Kilometres (Telegram द्वारे), Tummoc, Yatri, OneTicket, Highway Delite, आणि YatriCity Travel Guide अशा अ‍ॅप्सवरून तिकीट खरेदी करता येईल. यामध्ये OneTicket अ‍ॅपवरून मुंबई मेट्रो मार्ग ३, १, २अ आणिच्या तिकिटांसह सहज प्रवास करता येईल. याबबत मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या की, ही नवी सेवा सुरू करून आम्ही मेट्रो प्रवास अधिक सोपा, जलद आणि डिजिटल करत आहोत. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *