आरोग्य

कामा रुग्णालयातील माजी डॉक्टर कृतिका प्रसादची सुवर्ण कामगिरी

मुंबई :

दिल्लीतील संतोष विद्यापीठामधून कान-नाक-घसा या अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर शिक्षणात म्हणजेच मास्टर ऑफ सर्जरीमध्ये (एमएस) कामा रुग्णालयातील माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. कृतिका प्रसाद यांनी सुवर्णपदक पटकावले. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संतोष विद्यापीठाकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

कान नाक घसा या अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर शिक्षणामध्ये डॉ. कृतिका प्रसाद यांनी केलेली कामगिरी म्हणजे त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील समर्पणाचे आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी वचनबद्धतेचे प्रतीक आहे. कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयामध्ये सेवा देत असताना त्यांनी असाधारण क्लिनिकल कौशल्ये आणि उच्च दर्जाची रुग्णसेवा देण्याची आवड दाखवली. डॉ. प्रसाद यांच्या कामगिरीने त्यांच्या समवयस्कांना आणि भविष्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना प्रेरणा मिळाली. संतोष विद्यापीठातील पुरस्कार सोहळ्यात विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचा गौरव करण्यात आला. डॉ. कृतिका प्रसाद यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पालवे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *