शिक्षण

Mumbai University : सीडीओईच्या एमएमएस आणि एमसीएच्या ऑनलाइन नोंदणीला सुरुवात

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत (सीडीओई) चालविण्यात येत असलेल्या एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्) आणि एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी आजपासून अर्जाला सुरुवात होत आहे. २८ जून ते १७ जुलै २०२५ पर्यंत विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार असून २० जुलै २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे.

प्रवेश परीक्षेसाठीचा अर्ज https://forms.epravesh.com/MumbaiUniversity/ या संकेतस्थळावरून सादर करता येईल. एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्) आणि एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन) हे दोन्ही अभ्यासक्रम युजीसी आणि एआयसीटी मान्यताप्राप्त आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांच्या पात्रता, शूल्क, प्रवेश परीक्षेसंबंधातील अधिक तपशील मुंबई विद्यापीठाच्या सीडीओईच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचा : 11th admission : अकरावी प्रवेशाची सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार पहिली गुणवत्ता यादी

एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्) या अभ्यासक्रमासाठी ७२० एवढी प्रवेश क्षमता असून एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन) या अभ्यासक्रमासाठी २००० एवढी प्रवेश क्षमता आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून एआयसीटीई व यूजीसीने सीडीओईच्या माध्यमातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी परवानगी दिली असून हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. एचआर, फायनान्स व मार्केटिंग या तीन विषयात एमएमएस हा अभ्यासक्रम करता येतो. एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम आहे. विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *