
डोंबिवली ( शंकर जाधव )
खोणी-वडवली ग्रामपंचायतिच्या महिला सरपंच वैयक्तिक कारणाने रजेवर गेल्या. यामुळे उपसरपंच हनुमान ठोंबरे यांना प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती झाली. बुधवारी हनुमान ठोंबरे यांनी पदभार घेतला. यावेळी त्यांच्या चाहत्यांना पुष्पहार, पुष्पगुच्छ देत फटाक्यांची आतषबाजी त्यांचे कौतुक केले.
डोंबिवली शहराच्या जवळच असलेल्या खाणी – वडवली ग्रामपंचायत सशक्त ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विकासकामे होण्यासाठी निधीची कमतरता नसते. परंतु विकासाची दृष्टी असणारी व्यक्ती असावी असे अनेक ग्रामस्थांची इच्छा होती परिणामी विद्यमान सरपंच उज्वला जयेश काळोखे या एक महिना रजेवर आहेत. परिणामी त्या दरम्यान प्रभारी सरपंच म्हणून उपसरपंच हनुमान ठोंबरे यांना प्रभारी सरपंच म्हणून बुधवारी पदभार घेतला. गावातील चांगल्या विकास कामांची दृष्टी असणारे सरपंच हनुमान ठोंबरे गावात काम करतील असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
खोणी-वडवली गावात हनुमान ठोंबर यांचे वजन असून शिवसेना (शिंदे गट) मध्ये कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांनी खोणी-वडवली ग्रामपंचायत मध्ये निवडणूक लढवली असून ग्रामपंचायत माध्यमातून कामे केली आहेत. गावात सामाजिक, शैक्षणिक आणि स्वच्छता व विकास व्हावा यावर त्यांचा अधिक भर आहे. त्यामुळे त्यांनी जरी प्रभारी म्हणून सरपंच पदावर काम केले तरी गावात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होतील अशी चर्चा होती. ठोंबरे यांनी पदभार घेतल्यावर आमदार राजेश मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.