
डोंबिवली ( शंकर जाधव )
संपूर्ण महाराष्ट्रातील कोळीवाड्यांमधील तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उघडली गेली आहे. यॉटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि मत्स्यव्यवसाय व बंदर विभाग यांच्या संयुक्त पुढाकाराने, सर्फिंग, सेलिंग व स्टँड-अप पॅडल बोर्डिंग यांसारख्या सागरी खेळांचे प्रशिक्षण आता अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाची आणि ऐतिहासिक बाब आहे. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी ही देशातील सर्वात मोठ्यांपैकी एक आहे. या किनाऱ्यावरील कोळी समाजातील मुलांना या खेळांमध्ये प्रशिक्षित करून, एशियन गेम्स आणि ऑलिंपिक यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागासाठी सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाला मात्स्यव्यवसाय व बंदर विभागाचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा संपूर्ण पाठिंबा असून त्यांनी प्रशिक्षणासाठी आवश्यक जागा, उपकरणे आणि संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. हा उपक्रम यॉटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष सागर जोंधळे (डोंबिवली), हेतल काकू, चेतन सुनील राणे, प्रशांत जाधव, व अनीता म्हात्रे यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला. हा उपक्रम महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देण्याचा मार्ग प्रशस्त करतो, असे यॉटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष सागर जोंधळे यांनी सांगितले. म्हैसूर, कर्नाटक – जून २०२५ यॉटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (YAM) ने म्हैसूर येथील रॉयल म्हैसूर सेलिंग क्लब (RMSC) येथे झालेल्या YAI ज्युनियर आणि युथ मल्टीक्लास राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पुन्हा एकदा आपले नौकानयन कौशल्य सिद्ध केले आहे. महाराष्ट्र संघाने विविध गटांमध्ये सहा पदके जिंकून, उदयोन्मुख प्रतिभा आणि अपवादात्मक कोचिंग सपोर्टचे प्रदर्शन केले.