शहर

Dombivli : भोपर कमानी विभागात मोफत आरोग्य तपासणी

सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी माजी नगरसेविका रविना अमर माळी, अमर दादाजी माळी, प्रसाद गोपीनाथ माळी, संदिप गोपीनाथ माळी यांनी विशेष मेहनत घेतली

डोंबिवली ( शंकर जाधव )

भाजपा माजी नगरसेविका रवीना अमर माळी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका मानपाडा आरोग्य केंद्र अंतर्गत भोपर कमानी विभागात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा फायदा प्रभागातील लोकांनी मोठ्या संख्येने घेतला.

भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय भोपर कमानी येथील मोफत आरोग्य शिबिरात जनरल तपासणी, बी.पी., शुगर तपासणी, मलेरिया रक्त तपासणी, रक्त तपासणी, गरोदर माता तपासणी, कॅन्सर स्क्रीनिंग, औषधी वाटप, डोळ्यांची तपासणी लहान मुलांची तपासणी करण्यात आली.सदर मोफत आरोग्य शिबिरासाठी डॉ. स्नेहल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्ण तपासणी केली. यावेळी शिबिरात ज्येष्ठांसह तरुणांनीही डोळ्यांची तपासणी केली. सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी संदीप गोपीनाथ माळी, माजी नगरसेविका रविना अमर माळी, अमर दादाजी माळी, प्रसाद गोपीनाथ माळी,यांनी विशेष मेहनत घेतली. दरम्यान अमर माळी म्हणाले, सातत्याने प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी माजी नगरसेविका रविना माळी प्रयत्न करत असतात. तसेच प्रभागातील नागरिकांना विकास कामा करता निधी व योजनेचा लाभ नागरिकांना कसा मिळेल याकरता प्रयत्न करतात. प्रभागात जास्तीत जास्त आरोग्य शिबीर भरविण्यासाठी त्या पुढे असतात. तर डॉ. स्नेहल पाटील म्हणाल्या, या शिबिरात सर्दी, ताप, खोकला विषयीच्या समस्या असलेली लोकं जास्त प्रमाणात आढळून आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *