शहर

Mumbra News: मुंब्र्याच्या ज्ञानदीप विद्यामंदिरात रंगला विठुरायाचा पालखी सोहळा

समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचालित ज्ञानदीप विद्यामंदिर,मुंब्रा (Mumbra News) (मराठी माध्यम) व ज्ञानदीप कॉनव्हेट स्कूल (इंग्रजी माध्यम) शाळेत दिंडी सोहळ्याच्या रूपाने अवघी पंढरीचं अवतरली

डोंबिवली ( शंकर जाधव )

समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचालित ज्ञानदीप विद्यामंदिर,मुंब्रा (मराठी माध्यम) व ज्ञानदीप कॉनव्हेट स्कूल (इंग्रजी माध्यम) शाळेत दिंडी सोहळ्याच्या रूपाने अवघी पंढरीचं अवतरली होती. (Mumbra News)कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सतीश देसाई , संस्थेचे सेक्रेटरी समीर देसाई , संस्थेच्या उपाध्यक्षा शिवानी देसाई, संस्थेच्या खजिनदार प्रविणा देसाई, छायांक सतीश देसाई यांच्या हस्ते विठुरायाचे पूजन करून पालखी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.

विभागाच्या मुख्याध्यापिका कांचन ढाके , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक हेमंत नेहते शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी पालक सदस्य माजी विद्यार्थी उपस्थित होते. फुलांनी सजविलेल्या माऊलीच्या पालखीची ढोल, ताशा, लेझीमच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी आणि नागरीकांनी पालखीचे पूजन करून विठुरायाचे दर्शन घेतले.या दिंडी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी वारकरी व पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. विदयार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, पाण्याची बचत, आणि स्वच्छतेवर, आधारीत घोषवाक्यांचे फलक घेऊन जनजागृती केली. शाळेच्या मैदानात आरती करून सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मुलांना खाऊचे वाटप करून अत्यंत भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *