
कल्याण ( शंकर जाधव )
कल्याणमधील (kalyan) कर्णिक रोडवरील छत्रपती शिक्षण मंडळाचे नूतन विद्यालयात कलाशिक्षक सुप्रसिद्ध रांगोळीकार श्रीहरी पवळे यांनी संत सावता माळी यांचा अभंग ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी’या अभंगाचा आधार घेऊन विविध साकारली आहे. आठ बाय साडेतीन फूट आकाराच्या विठ्ठलाच्या मूर्तीला एकूण चार किलो भाजी लागली. यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अभंगाप्रमाणे वापरल्या असून ही रांगोळी काढण्यासाठी चार तास वेळ लागला. नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली होती. वारकरी वेषात टाळ-मृदूंगच्या गजरात विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी पाहुन नागरिकहि दिंडीत सहभागी झाले होते. विठ्ठल रखुमाईचे नाव घेत विद्यार्थी, शिक्षकवर्ग, नागरिक हे वारकरी बनल्याने कल्याण शहर हे प्रतिपंढरपूर होईल असे नागरिक म्हणत होते. कलाशिक्षक सुप्रसिद्ध रांगोळीकार श्रीहरी पवळे यांनी भाज्याचा वापर करत बनविलेली विठ्ठलाच्या मूर्तिचे दर्शन घेण्याकरता भक्तांनी गर्दी केली.