
डोंबिवली (शंकर जाधव) :
दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला डोंबिवली पश्चिमकडील स्टेशनपरिसरात हरी ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या वतीने आषाढी श्री विठ्ठलाची मूर्ती उभी करून कीर्तन केले. भाजपा प्रदेशअध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दरवर्षीप्रमाने यावेळीहि या ठिकाणी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन सर्वांना सुखात, आनंदात ठेव अशी प्रार्थना केली. कीर्तन सुरु असतानाही चव्हाण यांनी टाळ वाजत विठ्ठलाच्या भावाचा गजर केला.
अनेक वारकरी टाळ- मृदूंग घेऊन मंडळी कीर्तन करतात.भजन ऐकण्याकरता नागरिकांनी गर्दी केली.यावेळी भाजपा कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील, सचिव डॉ. सर्वेश सावंत यांसह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डोंबिवली पश्चिम मंडळाला दिली भेट
आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवली पश्चिम मंडळ कार्यालयाला भेट दिली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चव्हाण यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी, डोंबिवली पश्चिम मंडळ माजी अध्यक्ष समीर चिटणीस, राहुल सकपाळ, साधना गायकवाड, जयप्रकाश सावंत, कल्याण जिल्हा युवा मोर्चा सचिव योगेंद्र भोईर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत जल्लोष केला.