
मुंबई :
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादीमध्ये मुंबई विभागातून १ लाख ३९ हजार ९४३ विद्यार्थ्यांना जागा जाहीर (ॲलॉट) झाली. त्यातील ८७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी म्हणजे ६२.५५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पहिल्या यादीमध्ये कला शाखेमधून ७४.४४ टक्के, वाणिज्य शाखेतून ५५.४९ आणि विज्ञान शाखेतून ६७.९० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.
पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर ३० जूनपासून अकरावी प्रवेशाला सुरुवात झाली. मुंबई विभागातून १ लाख ३९ हजार ९४३ विद्यार्थ्यांना जागा जाहीर झाल्या. यामध्ये मुंबईतून ६४ हजार ८८७ विद्यार्थी, पालघरमधून १५ हजार ९३, रायगडमधून १३ हजार ८३७ आणि ठाण्यातून ४६ हजार १२६ विद्यार्थ्यांना जागा जाहीर झाल्या होत्या. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार मुंबईतून जागा जाहीर झालेल्या ६४ हजार ८८७ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ८०३ म्हणजेच ५५.१७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये कला शाखेमध्ये ३ हजार ६८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर वाणिज्य शाखेमध्ये १८ हजार ११ आणि विज्ञान शाखेतून १४ हजार १०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मुंबईमध्ये अद्यापही १ लाख ६३ हजार ४०७ जागा रिक्त आहेत.
ठाणे जिल्ह्यामध्ये जागा जाहीर झालेल्या ४६ हजार १२६ विद्यार्थ्यांपैकी ३० हजार ३३७ म्हणजेच ६५.७६ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये कला शाखेमध्ये ४ हजार ४४५, वाणिज्य शाखेमध्ये १२ हजार ७६ आणि विज्ञान शाखेमध्ये १३ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. ठाणे जिल्ह्यामध्ये अद्यापही १ लाख २७ हजार २३ जागा रिक्त आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये जागा जाहीर झालेल्या १३ हजार ८३७ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ४३४ म्हणजेच ८२.६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये कला शाखेमध्ये २ हजार १७२, वाणिज्य शाखेमध्ये ४ हजार २, विज्ञान शाखेमध्ये ५ हजार २६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. रायगड जिल्ह्यामध्ये अद्यापही ३६ हजार ७८६ जागा रिक्त आहेत.
पालघर जिल्ह्यामध्ये जागा जाहीर झालेल्या १५ हजार ९३ विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ९६६ म्हणजेच ६६.०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये कला शाखेमध्ये २ हजार ५०८, वाणिज्य शाखेमध्ये ४ हजार २६३, विज्ञान शाखेमध्ये ३ हजार ६४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पालघर जिल्ह्यामध्ये अद्यापही ५२ हजार ९६४जागा रिक्त आहेत.