
डोंबिवली (शंकर जाधव) :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मंगळवार 8 जुलै रोजी डोंबिवलीतील जनता दरबार घेतला होता. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्या पालिका आयुक्तांकडे मांडल्या. त्यानंतर पालिका आयुक्तांनी अचानक डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसराचा पाहणी दौरा केला. आयुक्त डोंबिवली आल्याचे समजताच भाजपा माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली.
डोंबिवली पश्चिमेलाही अचानक पाहणी दौरा करावा अशी मागणी केली. यावर आयुक्तांनी होकार दिला असून लवकरच डोंबिवली पश्चिमेला पाहणी करू असे सांगितले. तसेच डोंबिवली पूर्वेला सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी पुलाखाली कट्टावर जाळी लावून छोटी झाडे लावल्याचे पाहून आयुक्तांनी मुंबरकर यांचे कौतुक केले.तर सहायक आयुक्त संजय कुमावत यांच्या कामाचे कौतुक केले.