
माटुंगा :
प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकारांना तसेच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन व उत्तेजन देण्याच्या हेतूने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे यशवंतराव नाट्य संकुल, माटुंगा येथील तालीम हॉलच्या भाड्यात ५०% सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्या नाटकाची तालीम करण्यात येणार आहे. नाटकाच्या संहितेला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रायोगिक नाटक असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. तसेच सदर नाटकात काम करणारे सर्व कलाकार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य असणे बंधनकारक आहे.