
मुंबई (उमेश मोहिते) :
खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार व जाणीव न्यासाच्या माध्यमातून मराठी मुलांचा प्रशासकीय सेवांमध्ये तसेच शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये सहभाग वाढवा यासाठी नाममात्र शुल्कामध्ये सुरू केलेल्या MPSC/SSC स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी संमोहन तज्ञ विकास मनोहर नाईक यांचे “स्वसमोहन व स्पर्धा परीक्षेतील हमखास यश” हे प्रात्यक्षिका सहित मार्गदर्शन दिनांक ९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आले.
विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी त्याचं आत्मविश्वास, मनोधार्य वाढावे यासाठी अंतर्मनाला सूचना कशा द्याव्यात, त्याचा सराव कसा करावा, सूचना कशा असाव्यात या बद्दल सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्व संमोहनाच्या प्रात्यक्षिक सह महत्व सर्वांना पटवून दिले.
विद्यार्थ्यांनी या सेशनमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देत उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी संमोहन तज्ञ विकास नाईक यांचे खासदार अरविंद सावंत, दिलीप जाधव व समेळ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर नाईक यांनी संमोहन शास्त्रावरील त्यांची पुस्तके खासदारांना भेट दिली. आजचा उपक्रम हा नक्कीच सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असे प्रमोद व विकास वराडकर यांनी सांगून नाईक यांचे आभार मानले.