गुन्हे

विक्रोळी येथे पोलीस अधिकार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई :

विक्रोळी वाहतूक पोलीस चौकीतील एका पोलीस अधिकार्‍याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शंकर भिकाजी सोळसे असे या ५६ वर्षीय पोलीस अधिकार्‍याचे नाव असून आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

शंकर सोळसे हे विक्रोळीतील पार्कसाईट, शिवराज सोसायटीमध्ये राहतात. सध्या ते विक्रोळी वाहतूक पोलीस चौकीत सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते तळमजल्यावरील रुममध्ये तर त्यांची पत्नी रंजना सोळसे ही पोटमाळ्यावरील रुममध्ये झोपली होती. सकाळी साडेआठ वाजता तिला शंकर यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तिच्याकडे स्थानिक रहिवाशांना ही माहिती मिळताच त्यांनी पार्कसाईट पोलिसांना ही दिली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी शंकर सोळसे यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी त्यांची पत्नी रंजना सोळसे हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यात तिने शंकर यांचे दिड वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाले होते. त्याचा त्यांना प्रचंड त्रास होत होता. या त्रासाला ते प्रचंड कंटाळून गेले होते. त्यातून त्यांना मानसिक नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त केली होती. या आत्महत्येबात त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यामुळे त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्गसंपदा महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *