शहर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वन राणी’ टॉय ट्रेन पुन्हा दाखल

पहिली व्हिस्टाडोम टॉय ट्रेन दाखल; चाचणी धाव सुरू

मुंबई :

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (SGNP) प्रसिद्ध ‘वन राणी’ टॉय ट्रेन पुन्हा एकदा सुरू होणार आहे. उद्यानातील एक प्रमुख आकर्षण असलेली ही टॉय ट्रेन प्रणाली नव्याने सुसज्ज करण्यात आली असून विशेषतः मुलांना आनंददायक व रोमांचकारी अनुभव देणार आहे. नवीन व्हिस्टाडोम टॉय ट्रेन, जी पारदर्शक छप्पर व मोठ्या काचेच्या खिडक्यांसह आहे, अहमदाबादहून आली असून तिच्या चाचणी फेऱ्या सुरू झाल्या आहेत. २०२१ मध्ये आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे ही सेवा बंद झाली होती. मात्र उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘वन राणी’चे पुनरुज्जीवन पुन्हा गती पकडले आणि उद्यानप्रेमी, निसर्गप्रेमी व लहान मुलांची ही जुनी मागणी आता पूर्ण होणार आहे. चाचणी फेऱ्या यशस्वी झाल्यानंतर लवकरच नियमित सेवा सुरू होणार असून पर्यटक आणि विशेषतः लहान मुलांना मुंबईच्या हरित परिसरात फेरफटका मारण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. पावसाळ्यात उद्यानात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने हा उपक्रम अत्यंत योग्य वेळी सुरू होत आहे.

वन राणीचा ऐतिहासिक वारसा

मूळ ‘वन राणी’ टॉय ट्रेन १९८० च्या दशकात (किंवा १९७०?) सुरू झाली होती. ती केवळ तीन डब्यांची होती, परंतु मुंबईकरांच्या अनेक पिढ्यांची ती आवडती सफर बनली होती. मे २०२१ मध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे झाडे कोसळली, ट्रॅक खराब झाला आणि ट्रेन सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. पीयूष गोयल यांच्या पुढाकारामुळे ‘वन राणी’ आता नव्या रूपात, आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक डिझाईनसह परत येत आहे.

नवीन वैशिष्ट्ये आणि आधुनिक डिझाईन

नवीन व्हिस्टाडोम ‘वन राणी’ ही बॅटरीवर चालणारी आहे व चार डबे आहेत. पूर्वीच्या डिझेलवर चालणाऱ्या ट्रेनच्या तुलनेत ही अधिक पर्यावरणस्नेही आहे. या डब्यांवर SGNP मधील प्राणी आणि निसर्गचित्रे रंगवलेली असून त्यामुळे ही सफर शैक्षणिकही ठरेल. पारदर्शक छत व मोठ्या काचांच्या खिडक्यांमुळे संपूर्ण परिसराचा विहंगम अनुभव घेता येईल. या डब्यांची आसनरचना मेट्रोसारखी असून प्रवास अधिक आरामदायक ठरणार आहे. दुसरी एक टॉय ट्रेन लवकरच येणार असून तिचे डबे पूर्णपणे खुले (खिडक्या किंवा दरवाजे नसलेले) असतील, जेणेकरून प्रवासी निसर्गाचा थेट अनुभव घेऊ शकतील. प्रत्येक ट्रेनमध्ये ८० प्रवाशांची क्षमता आहे, जी पूर्वीपेक्षा जास्त आहे. ही टॉय ट्रेन ५.५ चौरस किमीच्या कृष्णगिरी उपवनातून जाते, विविध जैवविविधता स्थळांमधून, मिनी झूमधून, आणि कृत्रिम बोगद्यांतूनही जात असल्याने एक रोमांचक अनुभव देणार आहे.

सिर्फ सफर नाही; पर्यावरण जागृतीचा माध्यम

‘वन राणी’ ही केवळ मुलांची खेळणी ट्रेन नसून, ती शाश्वत व सर्वसमावेशक पर्यटनाची खूण आहे. ती पर्यावरण शिक्षणाचे साधन बनणार असून जैवविविधता व पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जागरूकता वाढवेल. ही आनंदासोबतच संवेदनशीलतेचा एक मृदू पण प्रभावी प्रयत्न आहे.

इतर पायाभूत सुविधा

  • ट्रेन मार्ग व स्थानके
    मार्ग कृष्णगिरी स्थानकापासून सुरू होतो, त्रिमूर्ती स्थानकावर थांबतो व पुन्हा कृष्णगिरी स्थानकावर परततो. त्रिमूर्ती स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे, तर कृष्णगिरी स्थानक अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण ट्रॅक टाकण्यात आला आहे व तांत्रिक काम अंतिम टप्प्यात आहे.
  • जाहिरात संधी
    SGNP प्रशासन टॉय ट्रेन व स्थानकांवर पोस्टर्स, स्टिकर्स इत्यादींच्या माध्यमातून ब्रँडिंग व जाहिरातीची योजना आखत असून त्यातून उद्यानाच्या देखभालीसाठी निधी निर्माण केला जाईल.

महत्त्वाची माहिती :

कृष्णगिरी स्थानक फुलपाखराच्या आकारात तयार होत आहे. परिवर्तन व निसर्गाचे प्रतीक. येथे प्रतीक्षागृह, तिकीट खिडक्या, कर्मचारी विश्रांतीगृह व दिव्यांगांसाठी रॅम्प असतील. कृष्णगिरी स्थानकाजवळ एक लोको शेड तयार करण्यात आले असून दोन्ही टॉय ट्रेनच्या पार्किंग व देखभालीसाठी याचा वापर होणार आहे. ‘वन राणी’चे पुनरुज्जीवन इको-टूरिझमच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. बॅटरीवर चालणारी इंजिन, निसर्गस्नेही सजावट व शैक्षणिक मूल्य ही हरित पर्यटनाची आदर्श उदाहरणे ठरत आहेत.

हेही वाचा : दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एमएमएस आणि एमसीए अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी मुदतवाढ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *