Uncategorized

गणेश भक्तांना दिलासा, ४४ अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार

दिवा–चिपळूण–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेन आता २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत चालवण्यात येतील

मुंबई :

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांना मध्य रेल्वेने (Central Railway) आणखी एक दिलासा दिला आहे. आधी जाहीर केलेल्या २५० गणपती विशेष ट्रेनव्यतिरिक्त मध्य रेल्वे ४४ विशेष ट्रेन चालवणार आहे. तसेच दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनचा विस्तार आणखी २ सेवा वाढवून करणार आहे. त्यामुळे गणेशोत्वनिमित्त चालविण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांची संख्या २९६ वर पोचली आहे.
विशेष गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेनच्या एकूण ८ सेवा चालविण्यात येणार आहेत. ०११३१ द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन प्रत्येक गुरुवार आणि रविवार २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण ४ सेवा चालविण्यात येतील. तर ०११३२ द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन प्रत्येक गुरुवार आणि रविवारी २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी सावंतवाडी रोड येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण ४ सेवा चालविण्यात येतील. या गाडयांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबा देण्यात आला आहे. २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन अशी या गाड्यांची संरचना असेल.
तसेच दिवा -खेड -दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्यांच्या ३६ सेवा चालविण्यात येतील. ०११३३ मेमू विशेष ट्रेन २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत दिवा येथून दररोज दुपारी १.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ८ वाजता खेड येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण १८ सेवा चालविण्यात येतील. तर गाडी क्रमांक
०११३४ मेमू विशेष ट्रेन २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत खेड येथून दररोज सकाळी ८ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजता दिवा येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण १८ सेवा चालविण्यात येतील. या गाड्यांना निळजे, तळोजा पांचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबा असेल.

गणपती विशेष ट्रेन क्रमांक ०११३१ साठी आरक्षण ३ ऑगस्ट पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि [www.irctc.co.in](http://www.irctc.co.in) या संकेतस्थळावर सुरू होईल.

दिवा– चिपळूण–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्यांचा विस्तार

ट्रेन क्रमांक ०११५५/०११५६ दिवा–चिपळूण–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या २ अतिरिक्त फेऱ्यांनी विस्तार करण्यात आलेला आहे. ०११५५ दिवा–चिपळूण विशेषची १ फेरी आणि ०११५६ चिपळूण–दिवा विशेषची १ फेरी वाढवण्यात आली आहे. यामुळे यापूर्वी जाहीर केलेल्या ३८ अनारक्षित विशेष ट्रेनऐवजी आता एकूण ४० अनारक्षित विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. दिवा–चिपळूण–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेन आता २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत चालवण्यात येतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *