
रत्नागिरी :
धम्मक्रांती जलसा कलामंच रत्नागिरी या संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्षे २०२५ मध्ये संगमेश्वर तालुक्यातील इयत्ता १०वी, १२वी व पदवी परिक्षेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या बौध्द समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव तसेच संगमेश्वर तालुक्यातील कार्यरत जलसा मंडळे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ रविवार १४ सप्टेबर २०२५ रोजी, सकाळी १० वाजता, शुभगंधा मंगल कार्यालय, मयुरबाग, मु.पो. लोवले, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी होणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थांच्या पालकांनी आपल्या पाल्याची माहिती विद्यार्थांचे पूर्ण नाव, १० वी, १२ वी, पदवी, शिष्यवृत्ती परिक्षेत प्राप्त झालेले टक्के, पुर्ण पत्ता व संपर्क क्रमांकासह पाठवावे. तसेच जलसा मंडळाचा विशेष सत्कार करण्यात येणार असून जलसा मंडळांनी आपल्या जलसा मंडळाचे पुर्ण नाव जलसा मंडळाच्या निर्मात्यांनी पाठवावे असे आवाहन धम्मक्रांती जलसा कलामंच रत्नागिरी संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक :- ८९९९४९४१८३/ ८६५७३८५३२३