शिक्षण

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी ई- गव्हर्नन्स राबवा – अनिल बोरनारे यांची मागणी

शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी कार्यालयाची कामे ऑनलाईन करा

मुंबई :

शालार्थ आयडी तसेच शिक्षण विभागातील इतर भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्व कामे ऑनलाईन करून ई – गव्हर्नन्स तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालय व शिक्षण निरीक्षक उत्तर, पश्चिम व दक्षिण कार्यालये, ठाणे, रायगड व पालघर शिक्षण अधिकारी कार्यालयांची सर्व कामे ऑनलाईन करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे. मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांना याबाबत बोरनारे यांनी निवेदन देऊन ही मागणी केली आहे.

प्रशासनामध्ये गतिमानता, कार्यक्षमता व पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शासनाच्या व्यवहारामध्ये सुसूत्रता आणता येते. यासाठी मंत्रालयीन तसेच राज्य शासनाच्या विविध खात्यात ई- गव्हर्नन्स संकल्पना वापरली जाते. तथापि शिक्षण उपसंचालक कार्यालयात मात्र अजूनही शिक्षक पालक संस्थाचालक तसेच मुख्याध्यापकांना अनेक कामांसाठी सतत खेटे घालावे लागून मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम व दक्षिण कार्यालय तसेच ठाणे, पालघर, रायगड या जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये सगळी कामे ऑनलाईन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा : नियमभंग केलेल्या २ हजार १५२ विद्यार्थ्यांच्या पुन्हा होणार परीक्षा

त्यामध्ये शालार्थ आयडी, शिक्षक शिक्षकेतर, वैयक्तिक मान्यता, विनाअनुदानितवरून अनुदानित बदली, शिक्षकांच्या विविध प्रकरणातील सुनावण्या, सर्व प्रकारची थकीत बिले, कार्यालयांची अद्ययावत वेबसाईट व ईमेल आयडी, वेतनेतर अनुदान, प्रवेश प्रक्रिया, आरटीई मान्यता, शिक्षकांची बदली मान्यता शिक्षकांच्या पीएफ परतावा व ना परतावा अग्रीम रक्कम, मेडिकल बिले, शिक्षक मुख्याध्यापकांची सेवा निवृत्ती प्रकरणे, सेल फायनान्सच्या मान्यता यासह सर्वच कामे ऑनलाईन कराव्यात अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *