
ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत डोंबिवली पोलीस ठाणे तर्फे शाळा – महाविदयालय संवाद मेळावा ( सायबर क्राईम व अंमली पदार्थ जनजागृती कार्यशाळा ) त कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी मार्गदर्शन केले.[Dombivli] मंगळवार 5 तारखेला ब्लॉसम महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवार, ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर, डॉ.विवेक पाटील, सुभाष सोनार, आदी मान्यवर उपस्थित होते.ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची संकल्पना आहे.
पोलीस उपायुक्त झेंडे उपस्थितींना मार्गदर्शन करताना म्हणाले,या जनजागृतीपर कार्यक्रमात आलेल्यांना याची माहिती मिळेल. सायबर क्राईम व अंमली पदार्थ जनजागृतीवर मार्गदर्शन केले.पुढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवार प्रस्ताविक करताना म्हणाले, तरुणाचा देश म्हणून भारताची ओळख आहे. हा कार्यक्रम घेण्यामागील उद्देश आहे की, पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महाविद्यालयात भेट घेत असतो. व्यसनाधिश तरुणांना यातून बाहेर काढणे, तरुणांना मार्गदर्शन करुन जनजागृती करणे आहे. प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात महिन्यातून एकदा सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून जनजागृती करावी असे प्रास्ताविक करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सतीशनायकोडी यांनी सांभाळली.या कार्यक्रमात प्राध्यापक, प्रिन्सिपल, शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते