शहर

मेट्रो ४ च्या मार्गिकेवर स्टील स्पॅनची यशस्वीरित्या उभारणी

मेट्रो ४ चे काम ८४.५ टक्के पूर्ण

मुंबई :

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो ४ मार्गिकेचे काम वेगाने सुरू झाले आहे. या मार्गीकेचे सुमारे ८४.५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील घाटकोपर पूर्व भागातील पंतनगर-घाटकोपर बस स्थानकावर स्टील स्पॅन यशस्वीरित्या बसविण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) यश आले आहे.

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिका ३२.३२ किलोमीटर लांबीची आहे. या मार्गिकेवर ३२ स्थानके असणार आहेत. या मार्गिकेसाठी सुमारे १४ हजार ५४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. एकूण पाच पॅकेजमध्ये या मेट्रो मार्गिकेचे काम करण्यात येत आहे. मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली. एमएमआरडीएच्या २०२० मधील नियोजनानुसार ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, लॉकडाउन आणि अन्य कारणाने प्रकल्पाचे काम काहीसे संथ झाले होते. त्यातच मेट्रो ४ मार्गिकेच्या ‘पॅकेज ८’, ‘पॅकेज १०’ आणि ‘पॅकेज १२’चे काम काही महिन्यांहून बंद होते. कंत्राटदार आर्थिक गर्तेत सापडल्याचा फटका मेट्रो मार्गिकेच्या कामाला बसला. त्यातून प्रकल्पाचे काम रखडले आहे.

हेही वाचा : नागपूर ते पुणे दरम्यान धावणार वंदे भारत ट्रेन

या कामाला पुन्हा एमएमआरडीएने गती दिली आहे. सध्या या मार्गिकेचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण मार्गिकेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए कामाला लागली आहे. त्यानुसार घाटकोपर पूर्व भागातील पंतनगर-घाटकोपर बस स्थानकावर स्टील स्पॅन उभारण्याचे काम गेले दोन दिवसांपासून हाती घेण्यात आले होते. ते आज पहाटे पूर्ण झाले. या वर्दळीच्या रस्त्यावर ५८ मीटर लांबीचा स्टील स्पॅन उचलून त्याच्या निर्धारित जागेवर बसविण्यात आला. हे काम करत असताना मुसळधार पाऊस, अंधेरी घाटकोपर लिंक रोड मार्गावरील प्रचंड वाहतूक आणि जवळच्या सोमय्या नाल्यामुळे मर्यादित जागा अशा कठीण परिस्थितीत हे काम सुरळीत पार पाडण्यात आले.

  • ४५० टन वजनचा स्पॅनचा
  • या स्पॅनची लांबी : ५८ मीटर, उंची: ३.१ मीटर, वजन: ४५० टनएकूण ५ स्टील गर्डर

 वापरण्यात आलेली संसाधने

  • ७०० मेट्रिक टन आणि ५०० टन क्षमतेचे क्रेन्स
  • ५०० टन आणि ८० टन क्षमतेचे राखीव क्रेन्स
  • १०० हुन अधिक कामगार, आवश्यक सुरक्षा कर्मचारी आणि अभियंते
  • ५० पेक्षा अधिक प्रशिक्षित वाहतूक कर्मचारी
  • ६ ट्रेलर्स, ३ हायड्राज, ३ आइसर ट्रक
  • ३ मॅनलिफ्टर्स, १ रुग्णवाहिका तैनात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *