
संगमेश्वर (उमेश मोहिते) :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये ग्रामपंचायतीचे उपसरपंच व धम्मक्रांतीचे जिल्हा संघटक प्रचित मोहिते यांचे चिरंजीव प्रज्ञेश मोहिते यांची रत्नागिरी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या निवड चाचणी मध्ये कर्णधारपदी निवड झाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा : स्पेनमधील गोविंदा पथक सिद्धीविनायक मंदिर व गेटवे येथे देणार सलामी
प्रज्ञेश मोहिते टेनिस क्रिकेटमध्ये उत्तम फलंदाज, गोलंदाज,त्याच बरोबर उत्तम क्षेत्ररक्षण म्हणून प्रसिद्ध असून यापूर्वी झालेल्या अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळेच रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या टेनिस क्रिकेट निवड चाचणीत प्रज्ञेश संस्कृती प्रचित मोहितेची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा १९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सोलापूर येथे संपन्न होणार आहे. प्रज्ञेश मोहिते हा माता रमाई जनसेवा संगीत जलसा मंडळ तेर्ये गावचा हार्मोनियम मास्टर असून, कलेबरोबर क्रीडा क्षेत्रातही उत्तम कामगिरी बजावत आहे. शैक्षणिक वर्षे २०२५ मध्ये इयत्ता १० वी परीक्षेत प्रज्ञेशने उत्तम यश संपादन केले असून ऑलराऊडर प्रज्ञेशला त्यांच्या पुढील वाटचालीस धम्मक्रांती व माता रमाई जनसेवा संगीत जलसा मंडळ तेर्येतर्फे आणि रत्नागिरी क्रिकेटप्रेमी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.