
मुंबई (उमेश मोहिते) :
दीप तारांगण क्रियेशन्स आयोजित कवी उदय जाधव लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशित “पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर” या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि चर्चा शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी, सायंकाळी ५ वाजता मृणालताई दालन, पहिला मजला, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, आरे रोड, अंबाबाई देवस्थान जवळ, गोरेगाव ( पश्चिम ), मुंबई – ४००१०४ या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार तथा कवी प्रेमानंद गज्वी होते. तसेच नामवंत कवी स्तंभलेखक अजय कांडर, नामवंत कवी- सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन, सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगे चर्चेत सहभागी झाले होते. साहित्य, राजकीय, सामाजिक या विषयावर चर्चा करण्यात आली. या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात “पांढराशुभ्र स्क्रीनवर” या कविता संग्रहातील कविता वाचन करून करण्यात आले. दादा कसं आहे नं – महादेव जाधव, लाल रिबीन – सुशांत पवार, उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणात- अमित कांबळे, जिंकायचं असेल तर..- स्वप्नील जाधव, एका चित्रामधी होता – दीपा खोत यांनी कविता सादर केल्या.
तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगे यांनी कविता वाचन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार तथा कवी प्रेमानंद गज्वी, नामांकित कवी स्तंभलेखक अजय कांडर, नामांकित कवी सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन, सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगे, दीप तारांगण क्रियेशनच्या दीपा खोत, कविता मोरवनकर, यांच्या हस्ते “पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार तथा कवी प्रेमानंद गज्वी म्हणाले “पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर” या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले. या कविता उदय जाधव यांनी लिहिलेल्या आजच्या काळाशी समर्पक, अशा कविता या संग्रहातून आपल्यासमोर येतात. आताचा काळ आणि बुद्धतत्त्वज्ञान, आंबेडकरी विचार यांची उत्तम सांगड या काव्यसंग्रहातून चित्रित केले आहे. उदयच्या कविता व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या. प्रेम कविता, विचार कविता, चिंतनात्मक कविता असा मोठा पट कवितेतून समोर येतो. हे या कवितासंग्रहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कवितेतून कमीत कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करायचे सामर्थ्य आहे. आणि या काव्यसंग्रहास मी शुभेच्छा देतो.
नामवंत कवी सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन म्हणाले की,उदय जाधव यांनी लिहिलेल्या त्यांच्या कविता खऱ्या अर्थाने वेगळेपण जपणारे आहे. याचे कारण एकाच वेळी आत्मलक्षी आणि बाह्यलक्षी आहे. समाजाची जी काही सुखदुःख आहेत कवितेतून व्यक्त झाली आहेत. आभासांचा आक्रोश व्यक्त केलेला आहे.
सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगे म्हणाल्या की, उदय जाधव लिखित “पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर” या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यामुळे खूप आनंद होतोय. या काव्यसंग्रहात अनेक कविता समाजाबद्दल, आठवणीबद्दल, प्रेमाबद्दल, इतर अनेक गोष्टींवर भाष्य करणारा कवितासंग्रह आहे. “पांढऱ्याशुभ स्क्रीनवर” काव्यसंग्रह नक्की वाचा असे आवाहन केले. उदय जाधव यांच्या कविता वाचल्यामुळे वेगळा अनुभव घेण्याची संधी मिळाली आणि खूप बरं वाटलं, आनंद मिळाला असं मत त्यांनी व्यक्त केले. उदय जाधवला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
नामवंत कवी, स्तंभलेखक अजय कांडर म्हणाले की, उदय जाधव हे मूळचे रंगकर्मी आहेत. पण एक चांगला रंगकर्मी, चांगला नाट्य लेखक हा चांगला कवी असू शकतो याचे चांगले उदाहरण आजचा कार्यक्रम आजचा काव्यप्रकाशन सोहळा या सगळ्याकडे पाहताना येतो. परंतु एवढेच नाही काळाचे भान, समकालीन गोष्टी, त्यांचे अंतर्विरोध समजून घेऊन या कविता लिहिलेल्या आहेत. त्यामुळे उदय जाधव यांच्या संग्रहातील कविता खूप पुढे जाणारी आहे. एक तर ह्या शोषणाच्या आणि आंतरविरोध पाहताना जाती-धर्म त्यातला भेद आणि सांस्कृतिक राजकारण येथून कविता लिहिली आहे. या पातळीवर ही कविता स्वीकारताना आजचे आजूबाजूचे वातावरण वाचकाला खुणावत राहते आणि वाचकालाच अंतर्मुख करत राहत असल्यामुळे ही कविता एका स्तरावर आशयाचा स्तर खूप उंचीवर जातो. ही कविता वाचायला पाहिजे असे मला वाटते.
हेही वाचा : श्रीमंत राजे रघूजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचे मुंबईत सोमवारी होणार जोरदार स्वागत
“पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर” या काव्यसंग्रहाचे लेखक उदय जाधव म्हणाले की जास्तीत जास्त लोकांनी काव्यसंग्रह वाचावा आणि प्रतिक्रिया द्याव्या असे आवाहन केले. तसेच प्रकाशन सोहळा उत्तमरित्या पार पडला यासाठी उपस्थित मान्यवर, सहकारी, यांचे आभार व्यक्त केले. या काव्य प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन कविता मोरवनकर यांनी केले. यावेळी दीप तारांगण क्रियेशन्सच्या दीपा खोत, संबंळ चित्रपट लेखिका रुपाली कुटे, बि. एन. जाधव, सामाजिक कार्यकर्ते दीपक कांबळे, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते अशोक चाफे, संकल्पचे अनिल कदम, लेखक प्रवीण धोपट, प्रसिद्ध वेषभूषाकार मंदार तांडेल आणि देवानंपिय असोक या नाटकातील अनेक नाट्य कर्मी तसेच साहित्यप्रेमी, नाट्यप्रेमी, शुभेच्छुक, हितचिंतक, पुरुष – महिला वर्ग, लहान मुले – मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.