क्रीडा

जुहू विले पार्ले जिमखाना आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत अंबिका – घुफ्रान विजेते

मुंबई :

जुहू विले पार्ले जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या अंबिका हरिथने अंतिम सामन्यात मुंबईच्या मिताली पाठकचा २४-११, २५-० असा सहज पराभव केला व विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला २५-१७, २५-४ असे सहज नमवले.

अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी अंबिकाने उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ८-२५, २३-१६, २५-२० असे हरवले होते. या सेटमध्ये सातव्या बोर्ड अखेरीस अंबिकाकडे केवळ २१-२० अशी १ गुणाची नाममात्र आघाडी होती. परंतु शेवटच्या बोर्डात डावाची सुरुवात करण्याची संधी तिच्याकडे असल्याचा फायदा उठवत तिसरा सेट २५-२० अशा ५ गुणांच्या फरकाने ती जिंकली. दुसरीकडे मितालीने ठाण्याच्या समृद्धीवर २१-१०, २५-१५ असा सहज पण अनपेक्षित विजय मिळवला होता. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला २५-१७, २५-४ असे सहज नमवले.

पुरुष एकेरी गटात विजेतेपद पटकावताना मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरवर २५-८, २५-२२ असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळावला. अंतिम सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी घुफ्रानने वाजिद अंसारीला १९-१४, २५-७ असे तर अभिजीतने संदीप दिवेला १९-३, १९-१० असे नमवले होते. या गटाच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत जळगावच्या संदीप दिवेने मुंबई उपनगरच्या वाजिद अंसारीवर २५-४, २५-८ असा सहज विजय नोंदवला.

हेही वाचा : Mumbai Rain : पावसाने घेतला माय लेकाचा बळी.. मुंबई हळहळली

विजेत्यांना जिमखान्याचे अध्यक्ष अनिल महेश, उपाध्यक्ष विजय मेहता, कार्यकारिणी सदस्य जगत किल्लावाला, इनडोअर सचिव संजीव शहा यांच्या शुभहस्ते पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, उपाध्यक्ष यतिन ठाकूर व सह सचिव केतन चिखले आवर्जून उपस्थित होते. जुहू जिमखान्याचे अध्यक्ष अनिल महेश यांनी प्रतिवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्याचे आश्वासन जिमखान्याच्या वतीने दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *